प्रतिनिधी : संजय वायकर
सोलापूर : १५ / सोलापूर विजापूर रोडवरील भ. बाहुबली मंदिरात सालाबाद प्रमाणे मानस्तंभास्थित,भ. आदिनाथ,भ.मुनिसुव्रतनाथ भ.पार्श्वनाथ व भ. बाहुबली स्वामी यांच्या परम पावन सातिशय महामूर्तीचा १९ वा
महामस्तकाभिषेक, ज्योती व सुधीर पंडित परिवाराच्या वतीने भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
सकाळी साडे दहा वाजता शुभांगी व सुधीर शहा, साधना व अरुण धुमाळ, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. माया व राजेंद्र पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन मांगलिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ज्योती व अभिनंदन विभुते यांच्या हस्ते.भ.बाहुबलीच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले.अरविंद धन्यकुमार शहा (रसना सुपारीवाले,सावळेश्वरकर) यांच्या हस्ते मंदिर नाम फलकाचे अनावरण करण्यात आले.
त्यानंतर अकरा वाजता जिनबिंब महामस्तकावभिषेक, शांति मंत्र इ. मांगलिक कार्यक्रम पार पडले. माणिक पंडित आणि सुवर्णा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी संपन्न झाल्यावर डॉ. पद्मप्रिया व गौरव सागर भोमाज परिवारातर्फे आयोजित महाप्रसादाने या वार्षिक उत्सवाची सांगता झाली.
यावेळी बाहुबली जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर पंडित, उपाध्यक्ष डाॅ. कैलास बोंदार्डे, सचिव अनिल माणिशेटे, विश्वस्त डाॅ.अजित माणिकशेटे, धीरज पंडित, सुनील गांधी(हरिभाई देवकरण) डॉ. अरविंद पंडित, प्राचार्य डॉ. अश्विन बोंदार्डे, अरविंद शहा, (सावळेश्वरकर) विश्वस्त जिनेंद्र कस्तुरे यांच्यासह या सोहळ्यास सुमारे सातशे श्रावक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

