shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गौरव राऊत यांचा वाढदिवस नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर या सामाजिक उपक्रमातून संपन्न.

गौरव राऊत यांचा वाढदिवस नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर या सामाजिक उपक्रमातून संपन्न.
 इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहरातील  युवानेते लोकसेवा युथ फाऊंडेशनचे  संस्थापक-अध्यक्ष गौरव प्रकाश राऊत  यांच्या वाढदिवसानिमित्त व भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधत लोकसेवा युथ फाउंडेशन च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दि.२६ नोव्हेंबर रोजी रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात १३२ रक्तदात्याने रक्तदान केले.तसेच नेत्र तपासणी शिबिरात एकुण ४८ जणांचे डोळ्यांचे मोफत शस्त्रक्रिया एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल, महम्मदवाडी,हडपसर येथे करण्यात येणार आहे.
  तसेच या शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रविण  माने,ॲड.राहुल मखरे,श्रीराज भरणे, महेंद्र रेडके, आबासाहेब वाघमारे,कैलास कदम,शकिल सय्यद,अनिल राऊत,अमोल राऊत,शेखर पाटिल, आदी उपस्थित होते. शिबिर पार पडण्यासाठी गौरव राऊत मित्र परिवारने कठिण परिश्रम घेतले.
close