श्री वर्धमान विद्यालयात उत्साहात साजरा झाला संविधान दिन
इंदापूर प्रतिनिधी:भारताचे संविधान म्हणजेच राज्यघटना होय.श्री वर्धमान विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा झाला. संविधान पुस्तिकेचे पूजन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्त श्री उबाळे सर यांनी संविधानाचे महत्त्व आपल्या मनोगतातून सांगितले. उद्देशिकेचे वाचन शिक्षिका नलिनी गायकवाड यांनी केले. संविधान दिनानिमित्त वालचंदनगर मध्ये भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देऊन संविधानाचे महत्व नागरिकांना सांगितले. कार्यक्रमासाठी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय साळुंखे उपस्थित होते. प्रास्ताविक उप मुख्याध्यापक बाळासाहेब पडारी यांनी केले तर सूत्रसंचालन सुरज मोरे यांनी केले.

