shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि मुलगा राजरत्न..!एकदा मन लावुन वाचा खरच डोळ्यात पाणी येईल..!!



26 नोव्हेंबर 1949 रोजी संध्याकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवांत सोप्यावर बसले होते, क्षनात हसत होते क्षनात रडत होते, शंकर आनंद शास्री सोबत होते, त्यानां समजेना नेमक झालयं काय ? त्यांनी विचारण्याचं धाडस केल..., बाबासाहेब म्हणाले शास्री मी आज आनंदात आहे कारण आज मी माझ ध्येय्य गाठलयं, आज मी माझं उद्धिष्ट पुर्ण केलयं आणि हे करत असताना मी काय-काय गमावलं त्याची चाचपनी करत होतो, व माझा एक काळ आठवला आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं, माझा एक काळ असा होता शास्री, ज्या काळी माझ्या खिशात एकही रुपयानव्हता व नेमका त्याच वेळेस माझा "राजरत्न" आजारी पडला होता,
माझ्या राजरत्नला ताप आला होता त्याचं शरीर तापाने फनफनत होत परंतु त्याच्या औषध उपचारासाठी माझ्या खिशात एकही रुपया नव्हता.


माझं राजरत्नवर खुप प्रेम होतं, शास्री अरे नेमकाच बोलायला लागला होता, नेमकाच चालायला लागला होता.औषधोउपचार नसल्यामुळे त्याचा ताप वाढतोय हे मला ठाऊक होतं, परंतु त्याला छातीशी कवटाळुन रडन्याशिवाय माझ्याकडे कुठलाच पर्याय नव्हता,
शास्री माझा राजरत्न माझ्या छातीशी कधी गतप्रान झाला हे मला सुद्धा कळलं नाही रे....!
सगळे लोक जमले सगळे शेजारी जमले एकजन माझ्याकडे आला व मला म्हणाला.बाबासाहेब "राजरत्न" चा आता अंतविधी करावा लागेल व त्यासाठी त्याला नवे कपडे घ्यावे लागतील, नवे कपडे म्हंटल्याबरोबर माझ्या काळजामध्ये चर्र झालं, कारण त्याच्या औषधोउपचारासाठी माझ्याजवळ एकही रुपया नाही, तर त्याला नवे कपडे घेण्यासाठी माझ्याकडे कुठुन पैसे येतील..??
काय करावं कळत नव्हत.काय करावं कळत नव्हत, कुनाला सांगाव समजत नव्हतं,
शास्री मी गुडघ्यामध्ये डोके खुपसुन ढसाढसा रडायला लागलो,

पण माझ्याकडे पैसे नाहीत हे माझ्या रामुला ठाऊक होत. माझी रामु जवळ आली तिने लुघड्याचा पदर फाडला त्या पदरामध्ये माझ्या राजरत्नला गुंडाळल आनी त्याचा अंत्यविधी केला.परंतु आज मला असं वाटत आहे कि माझ्या त्या राजरत्नच्या बलीदानाचं आज सार्थक झालं कारण आज मला असं वाटतय कि माझा एक राजरत्न गेला तर काय झाल याच्यानंतर येणारे माझे कोट्यानंकोटी राजरत्न ऊद्या टायकोटात सुटाबुटात येणार आहेत, व याच्या नंतर येणारा माझा एकही राजरत्न हा बिनाऔषधांशिवाय मरणार नाही, व एकही राजरत्न हा बिनाकपड्याचा चितेवर जळनार नाही याचं सुख मी आज अनुभवतोय....!
त्याच राजरत्न च्या बलिदानामुळे आज आम्ही शिकलो, सावरलो, मोठे झालो, नोकऱ्याला लागलो. त्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांसाठी आम्ही काय केलं...?? हे प्रत्येकाने आपापल्या काळजाला विचारन्याचा प्रश्न आहे...
close