*इंदापूर भाजप युवा मोर्चाने जोरदार घोषणाबाजी करीत खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात केले आंदोलन*
इंदापूर प्रतिनिधी: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल अपशब्द वापरल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यविरोधात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व इंदापूर भारतीय जनता युवा मोर्चाचे कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर भाजयुमोच्या वतीने इंदापूर नगरपरिषद समोर 'जोडे मारो आंदोलन' करुन निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी खासदार राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपले विधान त्वरित मागे घ्यावे आणि माफी मागावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा यावेळी इशारा देण्यात आला.
या प्रसंगी युवा वॉरियर्स चे पश्चिम महाराष्ट्र सहसयोजक प्रशांत गलांडे -पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पवार, रामजी आसबे, पृथ्वीराज जगताप, गणेश भांडवलकर, मयूर देवकर, सचिन जाधव, निखिल मगर यांच्या सह भाजयुमो पदाधिकारी उपस्थित होते.

