shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रोटरी क्लब ऑफ इंदापूरचा स्तुत्य उपक्रम, ज्येष्ठ नागरिकांचे केले मोफत मधुमेह निदान तपासणी.

रोटरी क्लब ऑफ इंदापूरचा स्तुत्य उपक्रम, ज्येष्ठ नागरिकांचे केले मोफत मधुमेह निदान तपासणी.

 ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह निदान तपासणी करता यावी म्हणून केले  शिबिराचे आयोजन - नरेंद्र गांधी.

 रोटरी क्लबचे रोट्रीयन हे कमवत्या पैशातून काही भाग समाजासाठी खर्च करीत असतात अशा माणसाचं खरंच कौतुक करावं असं वाटतं - नंदकुमार गुजर.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथे रोटरी क्लब ऑफ इंदापूर रोगप्रतिबंधक व उपचार टीम डिस्ट्रिक्ट ३१३१ व सिनसान फार्मासिटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांचे मोफत मधुमेह निदान जनजागृती व प्रतिबंध शिबिर दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ रोजी इंदापूर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात संपन्न झाला.               
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे अध्यक्ष नरेंद्र गांधी, सचिव सुनील मोहिते, मेडिकल डायरेक्टर रो. डॉक्टर सुधीर तांबिले,. रो. धरमचंद लोढा, रो आझाद पटेल, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रो.नंदकुमार गुजर, , रो. प्रमोद भंडारी,रो. समीर सूर्यवंशी, पांडुरंग जगताप, भाऊसो खबाले, बाबासाहेब घाडगे, भानुदास व्यवहारे प्रशांत घुले, नितीन शहा, सिनसान फार्मासिटिकल चे रीजनल मॅनेजर शिवा कोतले, एरिया मॅनेजर अंकुश वाकडेे, अमोल दोलतडे यांनी मधुमेह तपासणी केली.
 यावेळी रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे अध्यक्ष नरेंद्र गांधी यांनी उपस्थित यांना संबोधित करताना म्हटले की, रोटरी क्लब ऑफ इंदापूरच्या वतीने आज शनिवार असल्यामुळे या ठिकाणी जेष्ठ नागरिकांना मधुमेह तपासणी करता यावी या दृष्टिकोनातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे त्यांनी यावेळी मत व्यक्त केले.

 तसेच रो. व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नंदकुमार गुजर यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, रोटरी क्लब हा फक्त देशात नसून संपूर्ण जगामध्ये कार्य करीत आहे. देशात एकमेव असा क्लब आहे की स्वतःच्या खिशातून पैसे गोळा करून सामाजिक उपक्रम राबवतात .आज ज्येष्ठांसाठी मधुमेह शिबिर आयोजित केले असून मी जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. स्वतःसाठी माणूस व्यवसाय नोकरी काहीतरी करीत असतो परंतु समाजासाठी काहीतरी केले पाहिजे हा जो चांगला विचार करून रोटरी क्लबचे रोट्रीयन  कमवत्या पैशातून काही भाग समाजासाठी खर्च करीत असतात अशा माणसाचं खरंच कौतुक करावं असं वाटतं. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद भंडारी यांनी तर आभार प्रदर्शन हनुमंत शिंदे यांनी केले. यावेळी उपस्थित जेष्ठ नागरिकांनी मधुमेह निदान करून घेतले. 
close