शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. शनिवार दिनांक १९ ऑक्टोंबर २०२२
अहमदनगर एज्युकेशन सोसायटी वांबोरी च्या प्राथमिक शाळेत वार्षिक क्रीडा मेळावा संपन्न..!!
वांबोरी : अहमदनगर एज्युकेशन सोसायटी वांबोरी येथील प्राथमिक शाळा वांबोरी,ता. राहुरी येथे आज शनिवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी वार्षिक क्रीडा मेळावा संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून वांबोरी दूरक्षेत्र पोलिस स्टेशनचे बीट हवालदार श्री. चंद्रकांत ब-हाटे, पत्रकार श्री .गोरक्षनाथ दुधाडे, शाळा -चेअरमन श्री हेमंत मुथा साहेब , शाळेच्या मुख्याध्यापिका मीना पवार ,शाळेचे शिक्षक प्रतिनिधी सौ.उर्मिला शिंदे , पूर्व प्राथमिक शाळेच्या सौ. अंभोरे मॅडम यांच्या उपस्थितीत क्रीडा मेळाव्याचे आयोजन करण्यात आला होता.
श्री. चंद्रकांत ब-हाटे यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळास ही तितकेच महत्त्व द्यावे आणि अभ्यासही करावा. खेळाचे नियम, खेळाचे फायदे या संदर्भात मोलाची महिती या वेळीं प्रदान केली.
प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ५० मीटर धावण्याच्या स्पर्धेचा सुभारंभ करण्यात होता. या क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मनापासून आपला सहभाग नोंदविला होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सोनार मॅडम यांनी केले. तर आभार शिक्षक प्रतिनिधी श्रीमती शिंदे मॅडम यांनी मानले तसेच खेळाचे आयोजन श्री. खेले सर , श्री. सोनवणे सर यांनी केले तर श्रीमती तोडमल मॅडम यांनी उपस्थीत पाहुण्यांचा परिचय करून दिला. विद्यार्थ्यांबरोबर सर्व शिक्षकांनीं देखील याकार्यक्रमात सहभाग घेतला होता.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

