धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नरसिंह देवाच्या चरणी धनगर ऐक्य परिषद समन्वय समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घातले साकडे
इंदापूर प्रतिनिधी:शुक्रवार दि. १८ नोव्हेंबर२०२२ रोजी नरसिंहपूर या ठिकाणी धनगर ऐक्य परिषद इंदापूर यांच्यावतीने धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी लक्ष्मी नरसिंह चरणी अभिषेक घालून आंदोलन करण्यात आले. आत्तापर्यंत कोणत्याच सरकारने धनगर प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नाही. बारामती या ठिकाणी २०१४ साली धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सरबत पाजून उपोषण माघार घेण्यासाठी सांगितले होते. आमचे सरकार आल्यास आम्ही आरक्षण देऊ असे त्यांनी सांगितले होते. आता तरी त्यावेळेस चा शब्द त्यांनी पाळावा व आत्ताचे असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना नरसिंह देवाने सद्बुद्धी देवो व आरक्षणाचा तिडा लवकरात लवकर सुटावा या मागणीसाठी नरसिंह चरणी आज साकडे घालण्यात आले. व त्यानंतर त्या ठिकाणी नरसिंह देवाची आरती करण्यात आली. २१ नोव्हेंबर रोजी इंदापूर या ठिकाणी होणाऱ्या भव्य मोर्चाच्या आयोजनाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये इंदापूर तालुक्यातील मोटरसायकल रॅली काढून मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती धनगर ऐक्य परिषदेचे डॉ. शशिकांत तरंगे यांनी दिली.
यावेळी उपस्थित आप्पासाहेब माने, कुंडलिक कचरे, महेंद्र रेडके, सिताराम जानकर, बाळासाहेब नरुटे, विष्णू पाटील, संजय पाटील, वसंत मारकड, हमा पाटील, विजय वाघमोडे, विशाल मारकड, बाळासाहेब चितळकर, संपद सरक,सतीश तरंगे, मोरेश्वर कोकरे व धनगर ऐक्य परिषद समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

