निवडणूकां मध्ये राजकिय पक्ष उमेदवार म्हणून त्यांचे ऐकणारे व जे समाजावर कायम वर्चस्व गाजवतात व पैसे मुबलक खर्च करू शकतात अशाच लोकांना उभे करतात..!
प्रत्येक पक्षाचा माणनारा एक वर्ग असतो..ठरावीक वर्ग जाती, धर्माचे नेत्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करतात.. पण देशात ४०% असा मतदार आहे जो साक्षर , सुशिक्षीत आहे.. ज्याला कुठलाच उमेदवार आवडत नसतो.. भ्रष्टाचाराची चिड असते.. त्याला सहन होत नाही म्हणून तो मतदान न करण्याचा पर्याय निवडतो.
भ्रष्टाचाराने लिप्त उमेदवार निवडून येण्यासाठी साम दाम दंड भेद निती वापरतात, नातेगोते वापरतात. निवडणूकीत मतदारांना पैसे, दारू, पार्ट्या दिल्या जातात.. महिलांना हळदी कुंकु, साड्या वाटल्या जातात, बचत गटांचे माध्यम वापरले जातात..
अनेक सुशिक्षीत मतदार मतदाना साठीच्या प्रलोभनाला बळी पडतात.. मी जर प्रलोभन घेतले नाही तर वाटणारा माझ्या नावा पुढे फूली मारून माझे पैसे खाणार.. त्यापेक्षा मी का घेऊ नये व शिक्षणाने संपन्न झालेला मतदार त्यातल्या त्यात कमी भ्रष्टाचारी,त्यातल्या त्यात कमी जातीयवादी पक्ष किंवा उमेदवार अक्कल गहाण ठेऊन प्रलोभन घेऊन स्वत: भ्रष्ट होऊन उमेदवाराला मतदान करतो
मतदान न करणाऱ्या मतदारांची माणसिकता ओळखून सामाजिक कार्यकर्त्यांच्या दबावात निवडणूक आयोगाने ( NOTA none of the above) हा नवीन पर्याय मतदाराला दिला.. परंतु NOTA ला शासनाने उमेदवाराच्या यादीत शेवट ठेऊन उमेदवाराचा दर्जा NOTA ला दिला नाही..
शासना मध्ये असलेल्या राजकिय पक्षांना NOTA नको आहे.. मग ते सत्ताधारी असो की विरोधक.. सामाजिक भान असलेल्या कार्यकर्त्यांनी समाजाचे व देशाचे भान असलेल्या मतदारांसाठी NOTA हा पर्याय आणला आहे.. त्याला उमेदवाराचा दर्जा मिळण्यासाठी त्या उमेदवाराचा पर्याय सुज्ञ मतदाराला वापरावा लागेल.
जर मत पत्रिकेतील एकही उमेदवार मतदारास लायक वाटत नसेल तर निश्चित मतदाराने NOTA चा पर्याय निवडलाच पाहीजे.. जरी नोटा निवडून आला नाही तरी मतदाराने नालायकांना नालायक म्हणण्याचे धाडस मतदानातुन केलेच पाहीजे..!
*आपण मतदारांनी वारंवार हा पर्याय निवडला तर एक दिवस निश्चित उजडणार ,ज्या दिवशी NOTA ला उमेदवाराचा दर्जा मिळेल.. व मतदार नालायक उमेदवारांना नाकारू लागल्यास राजकिय पक्ष नालायक , गुंडांना, भ्रष्टाचारी उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेतुन हद्दपार करतील.. त्या साठी नालायक उमेदवारांना मतदाराला नाकारण्याचे धाडस करावे लागेल*
गुप्त मतदान पध्दतीत गुप्तपणे शेवटचे बटन NOTA चे दाबून नालायक उमेदवार नाकारा.. व जगातील सगळ्यात मोठी लोकशाही बळकटीकरण करा.. NOTA खुप कमी देशात आहे .. त्यात भारतात ही सुविधा आहे..
NOTA म्हणजे वाया जाणारे मत नव्हे तर सुदृढ लोकशाही बनवण्यासाठीची कळतनकळत केलेली अनमोल गुंतवणूकआहे.
आपल्या मत पत्रिकेत सगळेच नालायक उमेदवार असतील तर मतदान केंद्रावर जाऊन NOTA चे शेवटचे बटन निर्भिड पणे दाबा.. सिमेवर उभे राहून आपण बंदूक चालवल्या सारखे पवित्र काम लोकशाही रक्षणासाठी तुम्ही केले
जयहिन्द!
संजय भास्करराव काळे

