श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा येथे भारतीय संविधान या विषयासंदर्भात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन .
इंदापूर प्रतिनिधी: श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्यय आणि विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी " भारतीय संविधान "या विषयासंदर्भात एकदिवसीय कार्यशाळेचेआयोजन करण्यात आले होते .
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॅ.डी.वाय.पाटील व्यवस्थापन महाविद्यालय आकुर्डी ,पुणे येथील डॉ.शिवाजी माने यांनी मार्गदर्शन केले . त्याप्रसंगी त्यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व सांगून,विद्यार्थ्यांना आपल्या मुलभूत हक्क आणि कर्तव्य या विषयी जाणीव करून दिली.भारतीय संविधान दिनाचे महत्व सांगितले. भारताचे संविधान म्हणजे भारताची राज्यघटना होय. जगात सर्वात मोठे लिखित संविधान होय.भारतीय संविधानाने सर्वाना समान अधिकार दिले. संविधानाने सर्व जाती धर्म,पंथ यांना एकत्र गुंफून ठेवले आहे.या संविधानामुळेच आपला देश चालतो.सदर कार्यक्रमास डॉ.आर .एम.शेलार यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू वावरे होते.त्यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य, समता , न्याय बंधूता या मूल्यांची जोपासणा करण्यासाठी विद्यार्थ्यांना अवाहन केले.राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करू नये . संविधाना बाबत जनजागृती व्हावी. संविधानाविषयी लोकांच्या मनात आदर निर्माण व्हावा.काॅलेज मध्ये असलेले नाॅलेज प्रत्येक व्हिलेज पर्यंत गेले पाहिजे या उद्देशातून कार्यक्रमाचेआयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून २६ नोव्हेंबर रोजी शहिद झालेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
प्रास्ताविक डाॅ.तायाजी लोंढे यांनी केले.तर आभार डॉ.संजय मोरे यांनी मानले. सदर कार्यक्रमास प्रा.सोनम पवार. प्रा.दिप्ती पाटील,प्रा.प्रविण घोगरे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील मा सहकार व संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील , श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मनोज पाटील , श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे सचिव व किरणराव पाटील व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

