शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) :
राहाता तालुक्यातील पिंपळवाडी गावात सुजय दादा विखे पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते व युवा नेते राहुल तुरकने यांनी पिंपळवाडी च्या भरमसाठ वाढलेल्या 1500 दर 1200 करण्यात आला. पिंपळवाडीच्या झालेल्या ग्रामसभेत राहुल तुरकणे पाटील यांच्या शब्दाला मान देऊन वाढलेल्या पाणी पट्टी चा दर 1500 वरून 1200 करण्यात आला. झालेल्या ग्रामसभेत गावचे प्रथम नागरिक सरपंच रामनाथ नानासाहेब तुरकने, उपसरपंच दीपक भैय्या तुरकने व ग्रामसेविका शिंदे मॅडम व कमीत कमी चारशे ग्रामस्थ ग्रामसभेला उपस्थित होते. त्यानंतर राहुल भाऊ तुरकने यांनी गावाच्या बंधू- बघिनीचा सर्व विचार त्या ग्रामसभेत मांडला.
राहुल तुरकने यांनी असे सांगितले की 2014 च्या आत पाणी पट्टी चा दर 750 एवढा होता. पण 2014 नंतर 1500 करण्यात आला. त्यामुळे पिंपळवाडी गावात गोरगरिबांच्या पाणी पट्टी थकू लागले. त्यांनी असे पण सांगितले कि मागील 5 वर्षात थकलेल्या पाणी पट्टी ची जबाबदारी कोण घेईल .वाढलेल्या पाणी पट्टी चा दर कमी करण्यासाठी गावातील गोरगरीब लोकांनी राहुल भाऊ यांना पाणी पट्टी चा विषय ग्रामसभेत मांडायला लावला. त्यांचा मान ठेऊन सरपंच व उपसरपंच यांनी पाणी पट्टी 1500 वरून 1200 केली म्हणून त्यांचे पण आभार मानले.

