shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर पोलिसांचा अवैध गावटी दारूभट्टीवर कारवाई... २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत...

इंदापूर पोलिसांचा अवैध गावटी दारूभट्टीवर कारवाई... २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत...

इंदापूर प्रतिनिधी : इंदापूर पोलिस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र हद्दीतील बावडा येथे पोलीस निरीक्षक टी.वा. मुजावर यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर पोलिसांनी अवैध गावटी दारूभट्टीवर कारवाई करत तब्बल २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

बावडा भागात आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने अवैद्य बेकायदेशीर गावटी दारूभट्टीं बाबत इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुजावर यांना गोपनीय माहिती मिळाली.

मुजावर यांनी मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सहा.पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व इतर स्टाफ घेऊन प्रोहिबिशन रेड पथक रवाना करून ९ डिसेंबर २०२२ रोजी पहाटे ६.०० वाजण्याच्या सुमारास बावडा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी अवैध गावटी दारूभट्टींवर छापा टाकला असून यामध्ये आठ जणांवरती कारवाई करून तब्बल २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक फौजदार के. बी. शिंदे, युवराज कदम, महिला पोलीस हवालदार खंडागळे, पोलीस हवालदार मनोज गायकवाड, पोलीस नाईक सलमान खान, अमोल गायकवाड, सुनील कदम, आप्पा हेगडे, महिला पोलीस नाईक मुजावर, पोलीस शिपाई विकास राखुंडे, दिनेश चोरमले यांनी मिळून केली.


close