shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दत्तात्रय भरणे यांच्याकडून वाशिम जिल्ह्यात मॅरेथॉन बैठका..नागपूर येथील जन आंदोलनाची केली जय्यत तयारी,तब्बल 50 हजार कार्यकर्ते जाणार....

दत्तात्रय भरणे यांच्याकडून वाशिम जिल्ह्यात मॅरेथॉन बैठका..नागपूर येथील जन आंदोलनाची केली जय्यत तयारी,तब्बल 50 हजार कार्यकर्ते जाणार....
इंदापूर प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने नागपूर येथे १९ डिसेंबर रोजी विदर्भातील विविध प्रश्नांसाठी जन आंदोलन करण्यात येणार असून पक्षाने महत्वाच्या नेत्यांकडे या आंदोलनाची जिल्हावार जबाबदारी दिली आहे. यामध्ये माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशिम जिल्ह्यासाठी पक्ष निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.या निमित्ताने आज त्यांनी वाशिम जिल्ह्याची सकाळपासून आढावा बैठका घेऊन १९ डिसेंबर च्या जनांदोलनची जय्यत तयारी केली आहे.श्री.भरणे यांची उत्कृष्ठ संघटक म्हणून महाराष्ट्रात ख्याती आहे.त्यांच्यातील सामान्य कार्यकर्त्यात मिसळून काम करण्याच्या अनोख्या शैलीमुळे अल्पावधीतच ते अगदी शेवटच्या घटकात पोहचतात.त्यांची हिच शैली पाहून त्यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.
या विषयी बोलताना भरणे यांनी सांगितले की,विदर्भातील अतिवृष्टी व अवकाळीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे.त्यासोबतच सततच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणेही मुश्किल झाले आहे. तसेच परराज्यात जाणारे उद्योग धंदे व यामुळे बेरोजगारीचा प्रश्न जटिल होत चालला आहे.अशा प्रकारचे असंख्य प्रश्न राज्यासमोर असताना भाजप-शिंदे गट सरकार  य महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे.त्यामुळे या सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष असुन मा.शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस १९ डिसेंबर रोजी जन आंदोलन ऊभा करणार आहे.या आंदोलनाला वाशिम जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असून हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी वाशिम जिल्ह्याचे अतिशय सुक्ष्म नियोजन केले आहे.यासाठी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या जबाबदा-या देण्यात आल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.यावेळी माजी मंत्री सुभाषराव ठाकरे,जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,हाजी मोहम्मद,सोनाली ठाकूर,वैशाली मेश्राम,दत्तराज डहाके,गोविंद शर्मा यांच्यासह जिल्हा-तालुका पातळीवरील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
close