shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संवाद सभेच्या माध्यमातूनच कृषी व टपाल विभागाचे शासकीय योजनांची माहिती शेतकरी व नागरिकांना होते - सरपंच किरण पाटील

संवाद सभेच्या माध्यमातूनच कृषी  व टपाल विभागाचे शासकीय योजनांची माहिती  शेतकरी व नागरिकांना होते - सरपंच किरण पाटील

जागतिक मृदा दिनानिमित्त कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना  ऊस पाचट व्यवस्थापनची दिली शपथ .
इंदापूर प्रतिनिधी:  गेली वर्षभरापासून ग्रामपंचायत व शेतकरी संघर्ष समितीच्या संयुक्त प्रयत्नातून अनेक स्तुत्य उपक्रम राबवले जात आहेत. रक्तदान ,आरोग्य शिबिर ,शेती विषयक तज्ञांची व्याख्याने ,माती परीक्षण कॅम्प, ग्रामसुरक्षा दल स्थापन करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे इत्यादी उपक्रमात ग्रामस्थांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे. यातूनच गावाच्या विकासाला हातभार लागत आहे. याबरोबर गावातील महिला बचत गट ही सक्षम होत असल्याने महिला सक्षमीकरणाचे कामही वेगाने होत आहे. संवाद सभेच्या माध्यमातून आज कृषी विभाग व टपाल विभागाचे शासकीय योजनांची माहिती ही यामुळे शेतकरी व नागरिकांना होत आहेत असे मत बावडा गावचे सरपंच किरण पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात बावडा येथील शेतकरी संघर्ष समिती व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शेतकरी ग्रामस्थ संवाद सभेत व्यक्त केले. 
यावेळी या सभेस उपसरपंच निलेश घोगरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष तुकाराम घोगरे, विजय घोगरे, अभिजीत घोगरे, पवन घोगरे ,उमेश सूर्यवंशी, विजय गायकवाड, प्रसाद पाटील ,दादासाहेब कांबळे, विजय काटकर, महिला गटाचे अध्यक्ष सौ कविता घोगरे ,सौ मनीषा फरड बचत गटातील अनेक महिला व पुरुष सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

तसेच यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष पंडितराव पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात आपले मत व्यक्त करताना म्हटले की,शासनाच्या विविध खात्यातील कल्याणकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. बऱ्याच वेळा केवळ माहिती नसल्यामुळे खऱ्या गरजू शेतकरी या योजनेपासून वंचित राहतो. गरजू शेतकऱ्याला लाभ न मिळाल्यामुळे योजनेचे उद्दिष्ट सफल होत नाही .

 बावडा येथील यशवंत सोसायटीच्या हॉलमध्ये शेतकरी संघर्ष समिती व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या संवाद सभेत 
मंडळ कृषी अधिकारी बावडा कृषी विभाग व ग्रामपंचायत बावडा शेतकरी संघर्ष समिती यांच्या संयुक्त  विद्यमाने जागतिक मृदा दिन ,एकरी 100 टन ऊस उत्पादन व ऊस पाचट व्यवस्थापन मोहीम निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री सूर्यवंशी  यांनी जमिनीचे आरोग्य व कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच  हनुमंतराव बोडके यांनी एकरी शंभर टन ऊस उत्पादन या विषयी मार्गदर्शन केले .रिवुल्स इरिगेशन चे कृषी तज्ञ  जाधव यांनी पाणी व्यवस्थापन व ऊस पाचट व्यवस्थापन याविषयी माहिती दिली तर कृषी सहाय्यक महेश वाघ शेतकऱ्यांना ऊस पाचट व्यवस्थापन शपथ दिली
 यावेळी कृषी पर्यवेक्षक कल्याण पांढरेसो, रामदास शिंगटेसो, कृषी सहाय्यक अण्णासाहेब कदम महेश वाघ नवनाथ बोराटे संदीप घुले अंजली अडसूळ बोराटे मॅडम हिरवे मॅडम कृषी मित्र गणेश राऊत उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार पंडितराव पाटील यांनी केले
close