shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धक्कादायक घटना...! महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात महसूल अधिकारी अधिकृत वाहतूक करणाऱ्या गरिबांचेच करतात छळ...? राहुरी तहसील कार्यालयातील निंदनीय घटना...!

वडार समाजासाठी गौण खनिज (दगडखाणीतून) एका कुटुंबाला २०० ब्रास राॅयल्टी उत्खनन व वाहतूक करणेसाठी माफ ..असे २०१४ चा शासननिर्णय असताना राहुरी चे तहसीलदार शेख यांनी आर्थिक फायद्यासाठी वडार समाजाच्या युवकाचा छळ करून घेतला बळी..!

राहुरी । विशेष प्रतिनिधी :
राहुरी तहसीलदाराच्या मनमानी कारभाराला वैतागून देहरे, ता नगर येथील रेवन्नाथ शालिकराम धनवटे 41 वर्षीय वडार समाजाच्या युवकाने केली आत्महत्या. हा युवक अतिशय ‌कष्टाळू, संयमी, मनमिळाऊ व सुस्वभावी होता. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण होते.

      मृत रेवन्नाथ शालिग्राम धनवटे


घटनेचा सविस्तर वृत्तांत असा आहे की सदर युवक दोन दिवसापासून बेपत्ता होता.आज दिनांक 11/12 /2022 रोजी या युवकाचा मृतदेह नदीपात्रात आढळून आले.सदर मृतदेह नेवासा पोलिसांनी ताब्यात घेऊन नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.

या आत्महत्येचे कारण ऐकून धक्काच बसेल मृत युवकाच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुरीचे  तहसीलदार शेख यांनी डबर उत्खनन करणाऱ्या वडार समाजाच्या युवकाचे डंपर अडवून जप्त केले. त्यानंतर त्या युवकाकडे संपूर्ण उत्खनंची रीतसर परवानगी असताना हि त्याला त्याचे वाहन अनेक चकरा मारून विनंती करून देखील ताब्यात देण्यात आले नाही.
व याच जाचाला कंटाळून या युवकाने आत्महत्या सारखी टोकाची भूमिका घेतली. राहुरी येथील दोषी तहसीलदार शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांनी केली.त्यामुळे नेवासा तालुक्यात नेवासा ग्रामीण रुग्णालयात  समोर सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

वडार समाजाने छत्रपती शिवरायांच्या काळात देखील दगडाच्या खाणी निर्माण करुन दगडखाणीतून मुर्ती, गड,कोट, किल्ले, राजवाडे, भुयारी मार्ग,धरणे, विहीर मार्ग,पाटा -वरवंटा, किल्यावर जाण्यासाठी पायर्या व रस्ता निर्माण केल्याचे अनेक ऐतिहासिक उदाहरणे आहेत.दगडखाणीतून गौण खनिज उत्खनन वहातुक करणे वडारांचा प्रमुख व्यवसाय आहे. तसा शासननिर्णय देखील आहे.असे असताना महसूल अधिकारी राजरोसपणे अनधिकृत वहातूक करणार्यांना आर्थिक लाभ घेऊन अभय देत असल्याचे अनेक उदाहरणे असतानाा.. फक्त हा व्यवसाय रोजी रोटी असणार्या वडार समाजातील युवकांचे अहमदनगर जिल्ह्यातील महसूल अधिकारी नेहमी छळ करताना दिसत आहेत.. यापुुुर्वी ‌ही अनेक वडार व्यवसायिक युवकांना  खुुप मोठ्या प्रमाणात दंड ठोठावून नाहक वाहने जप्त करून देशोधडीला लावल्याचे उदाहरणे आहेत...! 
 
यापुढे वडार समाजातील युवकांना महसूल अधिकारी यांनी नाहक त्रास दिला तर वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य या राज्य संघाचे वतीने महसूल अधिकारी यांना "काळे फासा आंदोलन" केल्याशिवाय राहणार नाही. याची शासन - प्रशासनाने विशेष दखल घ्यावी. असा इशारा सकल वडार समाज, महाराष्ट्र राज्य यांनी "शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह‌" न्युज नेटवर्क ला निवेदनाद्वारे दिला आहे...
close