प्रतिनिधी : आसावरी वायकर
सोलापूर : ११ / येथील दि.जैन सैतवाळ सेवा मंडळ,प्राईम हेल्थ आणि ई.एन.टी.केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले होते.अशी शिबिरे ही काळाची गरज असून ती वारंवार घेतली जावीत, अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी उदघाटन प्रसंगी
व्यक्त केल्या. सामुदायिक णमोकार महामंत्रानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
डाॅ.सुहास करकमकर,डाॅ. प्रशांत गाडे,डाॅ.आदित्य पांढरे,डाॅ.सचिन पांढरे,डाॅ. श्रद्धा करकमकर-पांढरे,डाॅ.कल्पना पांढरे यांनी आरोग्य
तपासणी करुन मार्गदर्शन केले.सेवा मंडळ पदाधिका-यांच्या हस्ते प्रमुख अतिथी सीए.सुरेश पांढरे ,भारतीय जैन संघटनेचे राज्याध्यक्ष श्याम पाटील,बुबणे जैन मंदिराचे विश्वस्त हर्षवर्धन बुबणे आणि वरील सहा डाॅक्टरांचा, शाल,बुके आणि
सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष राजू देशमाने यांनी प्रास्ताविक करुन स्वागत केले.जीवनसाथी मासिकाचे
प्रमुख संपादक बाहुबली जि.पुर्वत यांनी मनोगत व्यक्त केले.सचिव अरुण धुमाळ यांनी सूत्रसंचालन करुन सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमास मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप पांढरे,कार्याध्यक्ष रवींद्र कटके,कोषाध्यक्ष सूर्यकांत जामगावकर, सहकोषाध्यक्ष राजेश मोहोळकर, सहसचिव अनुप म्हेत्रे,सदस्या अमिता र.कटके, मीना आळंदकर, सदस्य अमित अ.कटके,संदीप पुर्वत, सुनेत्रा पंडित, नंदकुमार कंगळे,नंदकुमार रणदिवे, बाहुबली भूमकर,किशोर म्हेत्रे,अनंतकुमार रणदिवे, अशोक भालेराव इ. समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी प्राईम हेल्थ, ई.एन.टी.केअर सेंटर,मेडिकल कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

