इंदापूर येथे जागतिक (अपंग )दिव्यांग दिन अपंग बांधवांच्या वतीने विविध उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा.
दिव्यांग बांधवांच्या या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल प्रवीण माने, अंकिताताई पाटील ,भरतशेठ शहा यांचे दिव्यांग बांधवांनी मानले जाहीर आभार.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथे जागतिक दिंव्याग दिनानिमित्त गुणगौरव समारंभ व नेत्र रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी नगरपालिकापासून ते शहा सांस्कृतिक भवन पर्यंत दिव्यांग बांधवांनी वाजत गाजत रॅली काढली.दिव्यांग बांधवांच्या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमास माजी सभापती बांधकाम व आरोग्य जि.प.पुणे चे प्रविण माने
यांनी या कार्यक्रमासाठी स्नेह भोजन दिले तर अंकीताताई पाटील- ठाकरे यांनी २५० रजाई गरजू गरीब दिंव्याग बांधवासाठी देऊन त्याचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या कार्यक्रमासाठी शाळा सांस्कृतिक भवन भरतशेठ शहा यांनी दिले त्याबद्दल सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने या कार्यक्रमाप्रसंगी जाहीर आभार मानण्यात आले.
बुधरानी हाॅस्पिटलच्या वतीने नेत्र रोग निदान शिबीर घेण्यात आले. यावेळी युनिक आयडी कार्ड तसेच उपस्थित मान्यवरांना सन्मान चिन्ह देवुन गौरविण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवर तहसीलदार श्रीकांत पाटील,वर्षा क्षीरसागर प्रशासकीय अधिकारी इंदापूर नगरपरिषद ,सामाजिक कार्यकर्ते नेताजी लोंढे, बहुजन समाज पार्टीचे जि.कोषाध्यक्ष श्रीपती चव्हाण, अॅडव्होकेट मंगेश लोंढे, सणसर गावचे सरपंच पार्थ निंबाळकर ,सणसर गावचे माजी सदस्य मोहन सुरुडकर ,बिल्डर ग्रुपचे अध्यक्ष राजाभाऊ जाधव, हमीद मुलाणी तसेच प्रहार संघटनेचे जि.उपाध्यक्ष बाबासाहेब पाडुळे ,ता.अध्यक्ष अंनतराव गायकवाड ,ता.सचिव रामदास चव्हाण ,ता.प्र.अध्यक्ष ज्ञानदेव कांबळे ,ता.कार्याध्यक्ष नाना लावंड ,ता.अध्यक्ष कु.दिपालीताई वाघमोडे, ता.उपाध्यक्ष सुक्षला ढाणे, ता.सचिव शोभाताई शिंगाडे, ता.सहसचिव रवि करे, ता.शहराध्यक्ष साबिया अत्तार ,ता.शहर उपाध्यक्ष रत्नमाला पाडुळे, शहराध्यक्ष सचिन सुर्यवंशी, शहर उपाध्यक्ष दादा पाटोळे ,शहर सचिव तुषार शेंडे ,शहर खजिनदार रहीम शेख तसेच इंदापूर तालुक्यातील सर्व प्रहार चे पदाधिकाऱी उपस्थित होते.

