shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यात शिवसेना शिंदे गटात इंदापूर तालुका समन्वयक ज्ञानेश्वर चौगुले व इंदापूर तालुका क्षेत्रप्रमुख व सहकार सेनेचे संघटक सुरज काळे यांनी केला प्रवेश.

इंदापूर तालुक्यात शिवसेना शिंदे गटात इंदापूर तालुका समन्वयक ज्ञानेश्वर चौगुले व इंदापूर तालुका क्षेत्रप्रमुख व सहकार सेनेचे संघटक सुरज काळे यांनी केला प्रवेश.

इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर अनेक ठिकाणी ठाकरे गटाची शिवसेना व शिंदे गटाची शिवसेना असे दोन गट तयार झाले. यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत(शिंदे गटात)  आता ग्रामीण भागातूनही  प्रवेश होणे चालू झाले आहे. त्याचाच भाग म्हणून इंदापूर शहरात काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे पक्षातून शिंदे गटात मोठ्या प्रमाणात प्रवेश झाला होता.वेगवेगळ्या पदावर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी थेट शिंदे गटात प्रवेश केला होता त्यातच  दि.03 डिसेंबर 22 रोजी माजी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाचे इंदापूर तालुका समन्वयक ज्ञानेश्वर चौगुले व इंदापूर तालुका क्षेत्रप्रमुख व सहकार सेनेचे तालुका संघटक सुरज काळे यांनी सासवड येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करुन ठाकरे गटाला एक प्रकारे धक्का दिला आहे. शिवसेनेमध्ये  वेगवेगळ्या पदावर प्रामाणिकपणे काम करत असतानाही सतत खच्चीकरण केले जात आहे त्याचप्रमाणे विश्वासात घेतले जात नाही म्हणूनच  चौगुले व काळे यांनी प्रवेश केला असल्याचे बाळासाहेबांची शिवसेना शहराध्यक्ष अशोक देवकर यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा प्रमुख सुरेंदर जेवरे,श्री.बबन खराडे, आण्णा काळे युवासेना,इंदापूर शहर प्रमुख अशोक देवकर,अवधूत पाटील,बालाजी पाटील आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close