shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कळतो का...शब्दालंकार..!

Date: Dec 3, 2022
.

शेतमालाला चांगला दर 
सांगा कधी मिळतो का ?
   
शेतकऱ्यासम जीव तुमचा 
सांगा कधी जळतो का ?

 


सणासुदीला चेहरा त्याचा
सांगा कधी उजळतो का ?
 
ओघ सुखांचा त्याच्याकडे 
सांगा कधी वळतो का ?
 
शेतकऱ्याच्या जीवास धोका 
सांगा कधी टळतो का ?
 
सत्ताधाऱ्यांना शेतकरी 
सांगा कधी कळतो का ?



दीपक महाले, शिरूर कासार.
मो.98 23 38 49 09
close