shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अपघातग्रस्त एम आय डी सी पोलिस ठाण्याजवळील दुध डेअरी चौक. ...! सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष...!!

नगरकरांनी व प्रवाशांनी ‌किती दिवस अन्याय सहन करायचा.!

दिनांक ३/१२/२०२२
नगर । प्रतिनिधी :
नगर -शिर्डी रस्त्यावरून (शेंडी)औरंगाबाद रस्त्याकडे जाणार्या एम आय डी सी. परिसरातील दुध डेअरी चौकात बाह्यवळणावर अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत..याकडे लोक प्रतिनिधी, बांधकाम विभागाचे अधिकारी, आरटीओ, पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते...!



याठिकाणी काही वर्षांपासून दररोज अपघात होण्याची मालिका सुरू आहे.   .. आज सुमारे २ वाजेच्या दरम्यान
राहुरी कडून येऊन औरंगाबाद रस्त्याकडे मार्गक्रमण करीत असताना बाह्यवळण रस्ता लवकर लक्षात न आल्याने अचानक वळण घेतांना लांबलचक कंटेनर क्र.MH-04 KU 2669 राहुरी कडून येत असलेल्या आयशर  क्र.MH -15 FV 6099 या वाहनाने पाठीमागून येवून सदर‌ कंटेनरला जोरात धडक दिल्याने आयशर गाडीची समोरील काच फुटून गळून पडली. सुदैवाने अपघातात मनुष्य हानि झाली नाही.परंतू अपघात भीषण प्रकारचे होते. 


याठिकाणी पुर्वी पोलिस थांबा असल्याने अपघात कमी प्रमाणात होत असे, परंतु आता मात्र पोलिस कर्मचारी तेथे थांबत नाहीत..सध्या दुध डेअरी चौक अतिक्रमणाच्या विळख्यात असल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे.. राहुरी कडून येत असलेल्या वाहनांना बाह्यवळण रस्ता लवकर लक्षात येत नाही.त्यामुळे आठवड्यातून  चार-पाच वेळा हमखास ‌अपघात होतातच..या ठिकाणी गोलाकार वळण असणे आवश्यक आहे. परंतू याकडे लक्ष देणार कोण?? हाच यक्ष प्रश्न आहे..

या परिसरात नेहमी‌ अपघात होतात.‌त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.. असे परिसरातील नागरिकांचे व  प्रवाशांचे म्हणणे आहे..खरे तर हे काम अहमदनगर सार्वजनिक बांधकाम मंडळाचे आहे.. परंतु सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिकारी सध्या सुस्त असून फक्त कार्यालयात बसून काम करण्याचे त्यांचे प्रखर धोरण दिसून येत आहे. 








close