shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कृषी विकास अधिकारी अनिल देशमुख यांनी पिटकेश्वर गावाची शरद आदर्श कृषी ग्राम अंतर्गत केली तपासणी

कृषी विकास अधिकारी अनिल देशमुख यांनी पिटकेश्वर गावाची शरद आदर्श कृषी ग्राम अंतर्गत केली तपासणी .
इंदापूर प्रतिनिधी:जिल्हा परिषदेच्या वतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीतील घटक गावे समृद्ध होतील हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शरद आदर्श कृषी ग्राम ही योजना राबवली जात असून  इंदापूर तालुक्यातील पिटकेश्वर येथे दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी शरद आदर्श कृषी ग्राम तपासणी पुणे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी  अनिल देशमुख यांनी केली.
या मध्ये" मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर महाराष्ट्र समृद्ध " या ध्येयासाठी शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना यात राबवण्यात आले आहेत.
 या तपासणी प्रसंगी  कृषी अधिकारी पंचायत समिती राजेंद्र काळे ,कृषी विस्तार अधिकारी शेख ,सरपंच सुनीता भोसले, वडापुरी ग्रामपंचायत नंदराज चंदनशिवे, संतोष गायकवाड, हनुमंत भोसले तसेच बायोगॅस सयंत्र बांधकाम करणारी पाटील इत्यादी उपस्थित होते.
close