शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
शनिवार दिनांक २४ डिसेंबर २०२२
कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या तडकाफडकी बदलीच्या विरोधात सर्वपक्षीय एकवटले..!!
राहुरी : राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील धर्मांतराचा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तारंकीत प्रश्न आ. राम सातपुते यांच्यासह इतर दोन आमदारांनी उपस्थित केल्याने राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची तडकाफडकी बदली केल्याने संतप्त झालेल्या सर्व पक्षिय व सर्व संघटना नागरीक यांच्यावतीने उद्या शनिवार २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वा.राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर नगर मनमाड रोडवर सर्वपक्षियांच्या वतींर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे रावसाहेब खेवरे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे यांनी रास्ता रोको आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले आहे.
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी धर्मांतराचं एक प्रकरण घडलं होतं. मात्र स्थानिक पोलिसांनी यात हलगर्जीपणा आणि दिरंगाई केल्याचं आरोप नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला.
याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत 15 दिवसांत चौकशी केली जाईल. तोपर्यंत राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची आजच नियंत्रण कक्षात बदली करण्यात येईल, असं गृह खात्याचे प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत जाहीर केलंय.
राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दराडे यांनी गुन्हेगारीवर वचक राखण्यात यश आले होते.
राहुरीतल्या महाविद्यालयीन मुलींची जर कोणी छेड काढत असेल तर संबंधित मुलींनी पोलीस निरीक्षक दराडे यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन पो.नि.दराडे केलं होतं.
पो. नि. दराडे यांनी यासाठी तयार केलेला व्हिडिओ सोशल मिडियावर तो व्हायरल करण्यात आला होता. त्या व्हिडिओला खूप लाईक्स आल्या होत्या. राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या अवैध धंद्यांवरही पो. नि. दराडे यांची करडी नजर टाकत कारवाईचा धडका लावला होता.
तोच दराडे यांच्या अचानक तडका फडकी बदलीची चर्चा येऊन धडकताच राहुरी तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.यामुळे उद्या सर्वपक्षीय राहुरीत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
"राहुरीचे पोलिस निरीक्षक दराडे यांनी दहा महिन्याच्या कालावधीत चांगले काम केले.राहुरीची गुन्हेगारी आटोक्यात आणली.इतरांनी आमच्या तालुक्यात आ.राम सातपुते यांनी सुपारी घेऊन नका खुपसु नये. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची राहुरीतुन बदली केली तर येणाऱ्या काळात उग्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेणार."
शिवसेना जिल्हाप्रमुख – रावसाहेब खेवरे
"राहुरीत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पो.नि. दराडे यांचे महत्त्वाची भूमिका आहे. जर असे घडत असेल तर यामुळे राहुरी तालुका बदनाम होत आहे. कधीही चुकीचे काम व गुन्हे दाखल केले नाही .काही समाजात वाद निर्माण करणाऱ्यांकडुन पोलिस अधिकाऱ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणतात.यामुळे राजकीय बळ वापरुन कारवाई करुन त्रास देण्याचे काम केले आहे."
आरपीआय जिल्हाअध्यक्ष – सुरेंद्र थोरात
"राहुरी तालुक्यात कायम आम्ही चळवळ चालवतो शेतकरी व सर्व सामान्य लोकांसाठी आंदोलन करत असतो. पण गेल्या वर्षभरात पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी कधीही चूकीचे काम केले नाही. किंवा खोटे गुन्हे दाखल केले नाही. मात्र अधिवेशनात माळशिरसचे आ. राम सातपुते यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला मात्र जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी झोपले का ? राजकीय सुडबूध्दीतुन हा प्रकार करण्यात आला आहे.
यामुळे आम्ही रस्त्यावर उतरत आहे. बदली थांबली नाही तर उग्र स्वरूपाचे आंदोलन होणार आहे."
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष – रविंद्र मोरे
बदलीनंतर राहुरीतील विविध संघटना, पक्ष व नागरिक यांच्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच आरपीआयचे सचिन साळवे,वंचित आघाडीचे पिंटू नाना साळवे,जय भीम क्रांती सेनेचे सुभाष संसारे यांनी राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणानंतर पोलीस प्रशासनाची एकच धांदल उडाली राहुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन तिघांना आत्मदहन करण्यापासून रोखले.
पोलीस निरीक्षक दराडे यांच्याबदलीच्या निषेधार्थ होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनात माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार आहे.
"चांगलं काम करणारे अधिकारी राहुरीत टिकून द्यायचे नाही असा विडाच काहींनी उचलला आहे. आज दराडे यांची झालेली बदली अतिशय चुकीच्या पद्धतीने झाली असून काम करणारे चांगले अधिकारी प्रताप दराडे यांचा बळी जाऊ देणार नाही"
-माजी राज्य मंत्री आ.प्राजक्त तनपुरे.
दरम्यान रास्ता रोको आंदोलनात राहुरी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांची सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष एम.डी. सोनवणे, शहराध्यक्ष संतोष आघाव तसेच ओबीसी सेलचे अध्यक्ष महेश उदावंत यांनी केले आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

