shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शरद कृषी महोत्सव २०२२ भव्य कृषी प्रदर्शन शेतकरी महिला मेळावा व युवक संवाद महोत्सव व रक्तदान शिबिर संपन्न .

इंदापूर येथे खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शरद कृषी महोत्सव २०२२ भव्य कृषी प्रदर्शन शेतकरी महिला मेळावा व युवक संवाद महोत्सव व रक्तदान शिबिर संपन्न .

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केले रक्तदान.
इंदापूर प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  आ. दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख  मार्गदर्शनाखाली इंदापूर मध्ये  गुरुवार दि.८ डिसेंबर २०२२ रोजी शरद कृषी महोत्सवाचे उद्घाटन झाले हे प्रदर्शन १२ तारखेपर्यंत  विविध उपक्रमातून आयोजन करण्यात आले
     इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत ' शरद कृषी महोत्सव २०२२' इंदापूर शहरातील नवीन तहसील कचेरी शेजारील प्रांगणात आयोजित केला होता.
यामध्ये शेतकरी,महिला मेळावा व   युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या राज्यस्तरीय कृषी महोत्सवात अनेक प्रकारचे विविध स्टॉल्स होते. 
     या मोहत्सवाचे उद्घाटन गुरुवारी ६ वाजता   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाले.तर शुक्रवारी सकाळी ११ वाजता. खास महिलांसाठी खेळ पैठणीचा व महिला मेळावा यात  कार्यक्रमास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर,  शर्मिलाताई पवार, सुनंदाताई पवार व इतर महिला मान्यवर उपस्थित होत्या.  शनिवार रोजी सकाळी ११ वाजता  दत्तात्रय भरणे व आ. रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी, यांच्या उपस्थितीत युवक मेळावा संपन्न झाला तर सायंकाळी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत युवा महोत्सवाची सांगता करण्यात आली.  रविवारी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन डॉक्टर दिगंबर दुर्गाडी यांनी उपस्थित  शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन केले व १२ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता खासदार शरद पवार यांचा वाढदिवस केक कापून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने रक्ताचा तुटवडा राज्यामध्ये निर्माण झाला असून त्यासंदर्भात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी येथील कार्यक्रमाप्रसंगी कार्यकर्त्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते त्या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आज रक्तदान केले. यामध्ये महिला पदाधिकारी छायाताई पडसळकर यांनी ही  रक्तदान केले.
close