shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी येथील हनुमान व्यायाम शाळा अँड फिटनेस क्लब चा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

वडापुरी येथील हनुमान व्यायाम शाळा अँड फिटनेस क्लब चा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील हनुमान व्यायाम शाळा जिम अँड फिटनेस क्लब वडापुरी चा तिसरा वर्धापन दिन दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी जिम मध्ये संपन्न झाला.
 यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र श्री प्रणिश कारभारी, बर्गे कंट्रक्शन चे आशिष बर्गे, प्रगतशील बागायतदार भागवत काटकर, प्रोफेशनल अकॅडमीचे कुणाल काळे,साई फेब्रिकेशनचे रहमान शेख, खुदाभाई शेख. तसेच हनुमान व्यायाम शाळेचे राजू गोसावी, रंजीत गोसावी, ओंकार पाटील, ओम गोसावी, निलेश शेलार, राहुल धोत्रे, तुषार गोसावी ,इतर जिम मधील सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांचे सत्कार करून स्वागत करण्यात आले. जिम मधील लहान सदस्यांनी जिमचे वस्ताद किरण गोसावी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देत  शुभेच्छा दिल्या. तसेच केक कापून वर्धापन दिनाचा जल्लोष साजरा करण्यात आला.

याप्रसंगी महाराष्ट्र श्री चे प्रणिष कारभारी यांनी उपस्थित जिमच्या सर्व सदस्यांना डायट, सप्लीमेंट, वर्कआउट याबद्दल योग्य मार्गदर्शन केले तसेच प्राध्यापक कुणाल काळे सर यांनी जिमची यशोगाथा आणि व्यायामाचा फायदा कसा होतो याबद्दल मार्गदर्शन केले.

तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल कदम यांनी केले.
close