shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पवार कुटुंबीयांचे कार्य सामाजिक बांधिलकीचे-मीनाताई जगधने


*डी.डी.काचोळे विद्यालयात बक्षीस वितरण समारंभ संपन्न

शौकतभाई शेख । श्रीरामपूर :
आमचे घरातील संस्कार समाजशील होते,आई वडिलांच्या शिकवणीनुसार आम्ही घडलो,घरी मोठमोठ्या आदर्श व्यक्तींचे ये - जा असायची अशा चांगल्या वातावरणाचा आम्हाला वारसा लाभला त्यामुळे आम्ही सर्व बहीण - भावंडे सामाजिक जाणिवेतून काम करत आहोत असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त डी.डी.काचोळे विद्यालयात कृतज्ञता सप्ताह निमित्त विविध उपक्रम व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मीनाताई जगधने अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बोलत होत्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मीनाताई जगधने होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक जीवन बोरसे,श्रीरामपूर मोटार वाहन निरीक्षक विकास लक्ष्मणराव सुर्यवंशी, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रोशनी डांगे,पांडुरंग सांगळे,इन्कम टॅक्स ऑफिसर अनिल काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
गीत मंचच्या मुलींनी स्वागतगीत सादर केले,त्यानंतर मुख्याध्यापक सुनील साळवे यांनी  प्रास्तविक केले.
शरदचंद्र पवार यांचे वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या सांघिक कबड्डी, खो.खो, क्रिकेट,तर वयक्तिक धावणे, निबंध,चित्रकला, रांगोळी, वकृत्व,संगीत खुर्ची,चमचा लिंबू स्पर्धेतील विजयी मुलामुलींना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले .
यावेळी जीवन बोरसे यांनी विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर रोशनी डांगे यांनी रस्ते सुरक्षेबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देताना सांगितले की, वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे,अपघात होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विद्यालय परिसरात विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.बक्षीस वितरण वाचन दतात्रय खैरे व नानासाहेब मुठे यांनी केले.अध्यक्षीय सूचना रंजना कदम यांनी मांडली तर रवींद्र निकम यांनी अनुमोदन दिले .वृक्षारोपण नियोजन पर्यवेक्षक बाळासाहेब रासकर व ज्येष्ठ शिक्षक संतोष सोनवणे यांनी केले.सुत्रसंचलन संगीता उगले यांनी केले तर आभार पी. सी.नरवडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर आणि कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.
close