shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडाळा येथे झालेले आंतर शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत करमाळा चेस अकॅडमी चे घवघवीत यश



प्रतिनिधी: सुर्यकांत होनप 

करमाळा: दि. ३/ करमाळा गुरुकुल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी अथर्व अमोल राठोड, याने जिल्हा स्तरावर बुद्धीबळ स्पर्धैत सहा फे-या पैकी चार फे-या  जिंकल्या. त्याच्या या यशाचं मनापासून कौतुक.

आज खेळाकडं फारसं गांभीर्यानं पालक पाहत नाहीत. हीच खूप मोठी चूक होते आहे. ‌अभ्यासा पलिकडं पण एक जग असतं विद्यार्थ्यांसाठी खेळाच़ं, कलेचं ! या गोष्टींची जाणीव आज व्हायला हवी. बुद्धीबळ सारख्या स्पर्धा आपल्या करमाळा सारख्या शहरपातळीवर  होतात आणि काही शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक विद्यार्थ्यांसाठी एवढी मेहनत घेतात. गोष्ट छोटी नाही डोंगरा एवढी आहे. असे आपले कितीतरी विद्यार्थी खेळांमध्ये निपून तरबेज होत चाललेत.
म्हणूणच अशा विद्यार्थ्यांना अनमोल अशा मार्गदर्शनाची गरज आहे.

खेळ, कला त्यातही बुध्दीबळ सारख्या स्पर्धा आणि करमाळा यांचं एक नातं जोडलं जातंय या गोष्टी खरंच कौतुकास पात्र आहेत. पुन्हा एकदा विजेत्या विद्यार्थ्यांचे आभाळभर कौतुक आणि सर्वांकडून या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
close