shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रोटरी क्लब ऑफ इंदापूर च्या वतीने इंदापूर उपजिल्हा रुग्णालयास बेबी वॉर्मर संच देऊन केले लोकार्पण.

रोटरी क्लब ऑफ इंदापूर च्या वतीने इंदापूर उपजिल्हा रुग्णालयास  बेबी वॉर्मर संच देऊन केले लोकार्पण.

रुग्णालयाची गरज ओळखून रोटरीने ग्रामीण भागात आरोग्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल रुग्णालय प्रशासनाने रोटरीचे मानले आभार.
 इंदापूर प्रतिनिधी: रोटरी क्लब च्या माध्यमातून इंदापूर उपजिल्हा रुग्णालयास बेबी वॉर्मर हा अत्याधुनिक संच भेट देण्यात आला आहे. यामुळे कमी वजनाच्या आणि कमी आठवड्यात जन्मलेल्या नवजात शिशूंचे आरोग्य राखण्यासाठी याचा फायदा होणार आहे.रुग्णालयाची गरज ओळखून रोटरीने ग्रामीण भागात आरोग्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल रुग्णालय प्रशासनाने रोटरीचे आभार मानले आहेत.
रोटरी क्लब ऑफ इंदापूर डिस्ट्रिक्ट ३१३१ ममता प्रोजेक्ट अंंतर्गत डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. डॉ.अनिल परमार यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब आँफ पूना वेस्ट,श्रीमती इंदुमती पी.परमार ऑफ पी.सी.परमार फाउंडेशन पनवेल यांच्या सहकार्याने विविध रुग्णालयात ११० बेबी वॉर्मर देण्यात येणार आहेत. शनिवारी ०३ डिसेंबर रोजी यातील पहिला बेबी वाॅर्मर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयास देण्यात आला. रोटरी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर सिनर्जी चारू श्रोत्री व ग्लोबल ग्रँड डायरेक्टर संतोष मराठे यांच्या हस्ते आणि रोटरी क्लब आँफ इंदापूर चे अध्यक्ष रो.नरेंद्र गांधी यांच्या उपस्थित याचे लोकार्पन पार पडले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे उपाध्यक्ष आझाद पटेल, सचिव सुनील मोहिते,डिस्ट्रिक्ट डायरेक्टर ज्ञानदेव डोंबाळे,  माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर, माजी अध्यक्ष उदय शहा, रो. सदस्य धरमचंद लोढा, प्रमोद भंडारी,वरकुटे माजी अध्यक्ष शशिकांत शेंडे,बाळासाहेब क्षिरसागर यांसह इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.दीपक चोरमले व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
close