shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जंक्शन येथील अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ला..

जंक्शन येथील अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ला..
  
आरोपीस तात्काळ अटक करा अन्यथा वडार संघटना व समाजच्या वतीने रस्ता रोको व तालुका बंदचे आंदोलन-  वडार पॅंथर संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल अण्णा पवार, भटक्या विमुक्त संघटनेचे प्रदेश सरचिटणीस तानाजी धोत्रे यांनी दिले निवेदन.
इंदापूर ( प्रतिनिधी):इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर परिक्षेत्रातील जंक्शन येथील आनंदघन सोसायटी परिसरात भटक्या विमुक्त जमातीतील म्हणजेच वडार समाजातील एक अतिशय गरीब कुटुंब राहत असून आपला आई-वडील, मामा, मावशी, काका यांच्यासोबत ते राहत असून तेथील एका इयत्ता बारावी शिकत असणाऱ्या अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून एका लिंगपिसाट  नराधम , पिसाळलेल्या कुत्र्या सारख्या युवकांनी धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला असून  वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


सदर हकीगत अशी की, वालचंदनगर परिक्षेत्रातील जंक्शन येथील आनंदघन सोसायटी परिसरामध्ये वडार समाजातील गरीब कुटुंब आपलं कष्ट करून उदरनिर्वाह करत आहे. त्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलगी आपल्या मामी सोबत किराणामाल आणण्यासाठी गेली असता, आनंदघन परिसरात राहणाऱ्या आरोपी रोहित चतुर(संपुर्ण नांव माहित नाही) यांनी पाठीमागून येऊन धारदार चाकूने प्राणघातक हल्ला करून जीव मारण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकरणी आरोपी रोहित चतुर याच्यावर गुन्हा दाखल केला असून भारतीय दंड सहित ३०७,३५४, ३५४डी, ९ १०, ४, १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून वालचंदनगर पोलीस व स्वता: बारामती उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे करत असल्याची माहिती दिली आहे.


तसेच इंदापूर तालुक्यातील अनेक शाळा, कॉलेज, विद्यालयामध्ये अल्पवयीन मुलींची छेडछाड प्रकरणात वाढ झाली असून सदर प्रकरणात शाळा, विद्यालय ,कॉलेज, प्रशासन मुख्याध्यापक शिक्षक वर्गांनी कडक धोरण राबवणे गरजेचे आहे. तसेच काही शाळांमध्ये शिक्षक, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्या वरती शाळकरी मुलीची छेडछाड बाबत गंभीर गुन्हे दाखल झाले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व भविष्यात असे गुन्हे घडून नयेत म्हणून व असे गुन्हे करणाऱ्या नराधमास, भ्याड हल्ला करणाऱ्या माथेफिरू यांच्यावर जबर बसवण्यासाठी पोलीस खाक्या दाखवणे गरजेचे आहे. असेही निवेदनात म्हटले आहे.


 तसेच पुढे निवेदनात म्हटले आहे की, सदर आरोपीस तात्काळ अटक करावे अन्यथा वडार पॅंथर संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष दयानंद इरकल, भटक्या विमुक्त संघटनेचे प्रदेश सरचिटणीस तानाजीराव धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वडार समाज बांधव ,वडार संघटना, सामाजिक, राजकीय संघटना च्या वतीने इंदापूर बंद व रस्ता रोको केला जाईल असे वडार पॅंथर संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल अण्णा पवार, भटक्या विमुक्त संघटनेचे प्रदेश सरचिटणीस,रोहित पवार, आप्पा मंजुळे, ॲड. विजय पवार, पिंटूशेठ घोडके, आधी यांनी बारामती उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


अल्पवयीन मुलीवर झालेल्या हल्यातील आरोपीला तात्काळ अटक करणार -डीवायएसपी गणेश इंगळे 

बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश  इंगळे यांनी तीन दिवसापुर्वी वालचंदनगर पोलिस स्टेशन परीक्षेत्रात जो एकतर्फी प्रेमातुन तरुणीवर जो हल्ला झाला होता. त्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अंकित गोयल  व बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागाचे  उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश  इंगळे  यांनी घटनास्थळी येऊन तब्बल तीन ते चार तास आसपासच्या लोकांची व संशयितांची स्वत चौकशी करुन लवकरात -लवकर आम्ही आरोपीला अटक करणार असुन त्या बाबतीत आमच्या हाती धागेदोरे लागले. असुन जो आरोपी याला या गुन्ह्यांत मदत करीत असुन त्याला देखील मदत केल्या प्रकरणी मोक्का लावणार असल्याचे श्री इंगळे यांनी सांगितले. आरोपीच्या शोध मोहीमेसाठी आम्ही पथक तयार करुन वेगवेगळ्या मार्गाने रवाना केले. असुन लवकरच आम्ही आरोपीच्या मुसक्या आवळणार आहोत असे सांगितले.
--------------
फोटो :-
वालचंदनगर :जंक्शन, आनंदघन सोसायटी परिसरात अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ला करणाऱ्या नराधमास तात्काळ अटक करावी या संदर्भाचे निवेदन बारामती उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांना देताना अनिल पवार, तानाजीराव धोत्रे,रोहित पवार, आप्पा मंजुळे, ॲड. विजय पवार, पिंटूशेठ घोडके, व इतर
close