shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतीचे , शिर्डी शहराचे प्रचंड नुकसानीस कारणीभूत ठरत असलेला शिर्डी नांदुर्खी शिव रस्ता का ? होत नाही - शेतकरी

खा.सुजय विखे पाटील यांनी  आदेश दिले माञ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष - शेतकरी 
गेल्या दोन तीन वर्षात पावसाळ्यात शिर्डी शहरात प्रचंड पाणी शिरुन शहर जलमय होत असल्याचे चिञ दिसत आहे.तर सन 22 मध्ये येथील रुग्णालये , व उपनगरे पुर्णताहा पाण्याखाली जाऊन नागरिकांचे प्रचंड हाल झाले. साचलेल्या पाण्याचा फटका शेतकरी वर्गालाही मोठ्या प्रमाणात बसला असुन या परिस्थितीस कारणीभूत ठरत असलेल्या शिर्डी नांदुर्खी शिव रस्त्याचे काम होत नसल्याने ही परिस्थिती उदभवत असल्याचे येथील शेतकरी बांधवांनी सांगितले आहे.याविषयी आपण वारंवार शिर्डी नगरपंचायतकडे पाठपुरावा केला असुन खा.सुजय विखे पाटील यांनीही ही समस्या सोडविण्यासाठी दोन महिन्यापुर्वी अधिकाऱ्यांना सुचना केल्या होत्या माञ अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही.


यामुळे  आता पुढील पावसाळ्यात पुन्हा तेच संकट येणार असल्याची भिती शिर्डी सोसायटी चे माजी चेअरमन विनायक यशवंत कोते , हौसीराम कोते , यादवराव माधवराव कोते , रमेश बन्सी कोते , दिलीप गवर्धन कोते , शंकर माधव कोते आदीनी व्यक्त केली आहे.आधीच शेतीचे प्रचंड नुकसान झाले असताना पुन्हा तीच परिस्थिती येऊ नये यासाठी  शिर्डी नांदुर्खी शिव रस्त्याचे तात्काळ काम करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
close