shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एकता साहित्य संमेलनात दीपक महाले यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन

शिरूर कासार -'शांतीवन' आर्वी, ता.-शिरूर कासार , जि.बीड ,येथे नुकतेच दोन दिवसीय एकता साहित्य संमेलन संपन्न झाले. त्यात व्यंगचित्रकार दीपक महाले यांच्या सामाजिक विषयांवरील व्यंगचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

शौचालय ,मोबाईलचा अतिवापर, पाण्याची बचत, हेल्मेटची आवश्यकता ,बेरोजगारी, वाढती महागाई ,वृक्षारोपण व संगोपन इत्यादी सामाजिक विषयांवरील व्यंगचित्रांना रसिकांनी दाद दिली. संमेलनाध्यक्ष दिनकर जोशी यांनी व्यंगचित्रांतून दिलेल्या संदेशांचे स्वागत केले.

पद्मश्री डॉक्टर रवी कोल्हे, पद्मश्री डॉक्टर स्मिता कोल्हे, 'शांतीवन'चे दीपककाका नागरगोजे, कथाकार डॉ. भास्कर बडे ,प्रकाशक मिलिंद काटे, आयटीआय इन्स्ट्रक्टर मनीषा महाले, नयन शेजुळ, कथाकार हिम्मतराव पाटील,  विजय जाधव, आदर्श शिक्षक प्रशांत मिसाळ, कवी लक्ष्मण खेडकर, देविदास शिंदे यांनी प्रदर्शनाला भेट दिली. दीपक महाले यांनी कथा व कविता लेखनातूनही ठसा उमटवला आहे.
close