shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रसाद नगरच्या बंद दगडखान जागेत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविणार - आ. बच्चुभाऊ कडू..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
गुरूवार दिनांक २९ डिसेंबर २०२२

प्रसाद नगरच्या बंद दगडखान जागेत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविणार - आ. बच्चुभाऊ कडू..!!
नागपुर  : श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील देवळाली प्रवरा हद्दीत प्रसादनगर भागात असलेल्या बंद दगडखान जागेत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबवून तेथील गरिबांना घरे उपलब्ध करून देवू असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार बच्चुभाऊ कडू यांनी नागपूर येथे केले.

     नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधान मंडळाच्या दिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने कच्च्या मातीच्या पाल घरामधील भटक्या विमुक्त जाती जमती नागरिकांना घरे मिळावीत म्हणून आ. बच्चुभाऊ कडू यांनी उभारलेल्या आंदोलन प्रसंगी अहमदनगर जिल्ह्याचे प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अप्पासाहेब  ढूस यांनी त्यांची भेट घेऊन प्रसादनगर झोपडपट्टी संदर्भात चर्चा केली असता प्रसंगी बच्चुभाऊ कडू बोलत होते.
      श्रीरामपूर विधानसभा क्षेत्रात असलेल्या देवळाली प्रवरा हद्दीतील प्रसादनगर भागामध्ये जवळ्पास चार एकर जागेत गेल्या ४० ते ५० वर्षांपासून शासनाच्या बंद दगडखाणी आहेत. त्या बंद दगड खाणीमध्ये सार्वजनिक शौचालयाचे व गटारीचे पाणी साचून परिसरामध्ये मोठी दुर्गंधी पसरते त्यामुळे जवळपासच्या दोन ते तीन हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.. शासनाच्या घरकुल योजनेसाठी गरिबांना देण्यासाठी एकीकडे जागा उपलब्ध नाहीत. तर दुसरीकडे देवळाली प्रवरा हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर बंद दगड खानीच्या रूपाने पडून असलेल्या या चार एकर जमिनीमध्ये भराव घालून त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबवून परिसरातील भटक्या विमुक्त जाती जमातीचे नागरिक तसेच विधवा विदुर परितेक्ता तसेच वृद्ध अपंग आणि अनाथ नागरिकांना हक्काचे घर व जागा उपलब्ध करून देण्यासाठी या बंद दगड खान जागेत भराव घालून त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबवावी आणि त्या जागेमध्ये या गरिबांना घरी देण्यात यावी अशी मागणी प्रहारचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अप्पासाहेब ढूस व जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांनी आमदार बच्चू भाऊ कडू यांच्याकडे निवेदनाद्वारे करून त्यावर सखोल चर्चा केली. 
     प्रसंगी बोलताना आ. बच्चुभाऊ कडू यांनी सांगितले की, आम्ही उभारलेले आंदोलन त्यासाठीच असून देवळाली प्रवरा हद्दीतील प्रसाद नगर भागामध्ये असलेल्या बंद दगडखान जागेत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री महोदयांसी चर्चा करून लवकरच या प्रस्तावाला मान्यता घेऊ आणि तेथील गोरगरिबांना न्याय मिळवून देऊ. 

    देवळाली प्रवरा हद्दीतील प्रसाद नगर बंद दगडखान जागेमध्ये होणाऱ्या या संभाव्य घरकुल योजनेसाठी लाभधारकांनी मागणी अर्ज भरावेत यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या देवळाली प्रवरा सोसायटी चौकामध्ये असलेल्या कार्यालयात अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले असून पात्र लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी संपर्क करून अर्ज भरण्याचे आवाहन प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अप्पासाहेब  ढूस यांनी केले आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close