दूधगंगा दूध संघ इंदापूर येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नाम जय घोषात पुष्पवृष्टी करीत झाला दत्त जन्म सोहळा संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथील असणारी दूधगंगा दूध संघ इंदापूर येथील दत्त मंदिरात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २ डिसेंबर पासून दत्त जयंती सोहळा निमित्त गुरुचरित्र पारायण चालू होते त्याची सांगता समारोप दिनांक ७ डिसेंबर २०२२ रोजी दत्तयाग महापूजा दूधगंगा दूध संघाचे व्हाईस चेअरमन उत्तम जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले .सायंकाळी ६ वाजता भजन करीत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामघोष करीत टाळ मृदुंगाच्या गजरात पुष्पवृष्टी करीत आरती करून दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
या जन्म सोहळ्यानंतर उपस्थित भाविक भक्तांनी व मान्यवरांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
या कार्यक्रमाप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, हर्षवर्धन पाटील वाहतूक संघाचे चेअरमन रघुनाथ राऊत, अशोक ईजगुडे, शिवाजी यादव, दयानंद गायकवाड, शहाजी शिंदे, शामराव परकाळे, संजय काळे, बाबुराव पाटोळे, अतुल वाघमोडे, अभिजीत माने, धनंजय पाटील, शेखर पाटील, नानासाहेब पाटील, दूधगंगा दूध संघाचे कार्यकारी संचालक प्रसाद गायकवाड व इतर भाविक भक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

