महाराष्ट्राची भूमी साधुसंतांच्या व नद्यांच्या सहवासाने सदैव्य पावन झालेली आहे. अशा महान संत साईबाबांच्या पावन भूमिजवळ व दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या तीरावर सन १९६४ मध्ये तत्कालीन उद्योगपती करमसीभाई सोमय्या यांनी शेतकरी-कष्टकरी, गरिबांचे कैवारी व शिक्षणप्रेमी के. बी. रोहमारे (दादा) यांच्या प्रयत्नातून के.जे.सोमय्या वरिष्ठ महाविद्यालयाची स्थापना केली. सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्ञानदानाच्या भावनेतुन गोदावरी नदीच्या तीरावर लावलेले हे छोटेसे रोपटे अनेक संकटाना सामोरे जात आज एक वटवृक्ष बनले आहे. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हे ब्रीदवाक्य सार्थ करून ज्ञानदानाचे पवित्र काम करत असलेले हे महाविद्यालय विद्यार्थांना ज्ञानाबरोबरच सन्मान मिळवुन देण्याचे काम अहोरात्र करत आहे.
आज या महाविद्यालयाला आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या बळावर बंगलोर स्थित नॅक संस्थेने दोन वेळा 'अ' श्रेणी देऊन गौरवान्वित केलेले असून विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या गेलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 'उत्कृष्ट महाविद्यालय' म्हणुन पुरस्कृत केलेले आहे. कै. के. बी. रोहमारे व या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अशोकराव अण्णा रोहमारे यांच्या शैक्षणिक दूरदृष्टीतुन साकारलेल्या या महाविद्यालयाने परिसरातील विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून व्यवसायाभिमुख अनेक कोर्स सुरू केलेले आहेत..के.बी दादा यांच्या पश्चात ज्ञानदानाची ही गंगोत्री समर्थपणे व तेवढ्याच सक्षमपणे पेलवणारे कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे (आण्णा) यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली संशोधन, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात महाविद्यालयाने घेतलेली भरारी सर्वांचेच डोळे दिपवून टाकणारी आहे. या शैक्षणिक ज्ञानदानाच्या पर्वणीत आण्णांना साथ देणारे संस्थेचे एक अभ्यासु विश्वस्त तसेच कार्यकुशल हसमुख व्यक्तिमत्व, शिर्डी शहराचे प्रथम सरपंच कै. मुकुंदआण्णा कोते यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. शिर्डी सारख्या धार्मिक भुमिला शिक्षणाची जोड देऊन शिर्डीकरांमध्ये शिक्षण संस्कृति रुजविण्यामध्ये कै. मुकुंदआण्णा कोते यांचे योगदान कुणीही विसरू शकणार नाही. कै. के.बी.रोहमारे (दादा) यांनी उभ्या केलेल्या ह्या ज्ञानगंगोत्रीची पायाभरणी जरी कोपरगांवसारख्या ठिकाणी झाली असली तरी तीचा ज्ञानरुपी वेल संपूर्ण राज्यभर पसरलेला आहे. ही आपल्या सर्वांसाठी गौरवाची व सन्मानाची बाब आहे. कोपरगांव परिसरातील सर्व जाती-धर्मातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी उभ्या केलेल्या के. जे. सोमय्या (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाच्या सदस्यपदी शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष नीलेशदादा कोते पाटील यांची तर तज्ञ सदस्यपदी तुकाराम पाटील गोंदकर पाटील यांची सार्थ नियुक्ती करण्यात आली.. कोणतेही पद असो अथवा नसो नीलेशदादांनी नेहमीच आपल्या लोकाभिमुख कार्यातून आपल्या कामाची पद्धत दाखवलेलीच आहे.एक सुसंस्कृत आणि सर्व स्तरातील आवडते असणारे नीलेशदादा कोते यांची निवड सार्थच आहे आणि शिर्डीमध्ये झालेल्या ऐतिहासिक गंगागिरी महाराज यांच्या सप्ताहाचे अध्यक्ष आणि साई समर्थ पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन तुकाराम पाटील गोंदकर यांची निवड देखील अतिशय योग्य आहे.. दोघांचेही अभिनंदन व भावी कार्यास मनापासून शुभेच्छा..वरील निवडी बद्दल मा ना राधाकृष्ण विखे पाटील, खा सुजय दादा विखे पाटील, खा सदाशिव लोखंडे साहेब,जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते,नगराध्यक्ष अर्चनाताई कोते, यांनी अभिनंदन केले आहे
कमलाकर कोते पाटील
जिल्हाप्रमुख बाळासाहेबची शिवसेना शिरडी ता राहाता

