शौकतभाई शेख श्रीरामपूर:
येथील प्रथितयश व्यापारी सतीश टायर मॉलचे मालक प्रीतेश कुंकूलोळ यांची कन्या कु.अर्णा कुंकूलोळ हिने राष्ट्रीय रंगोस्तव हस्ताक्षर स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकविले असून तिची आंतरराष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
श्रीरामपूर येथील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात योगदान असलेले दानशूर व्यक्तीमत्व सतीश कुंकूलोळ यांची कु.अर्णा ही नात आहे. तिने यापूर्वीही विविध शालेय स्पर्धा, क्रीडा स्पर्धा यामधे यश मिळवले आहे.तिची निवड हा श्रीरामपूर साठी मोठा सन्मान आहे.
कु.अर्णा हिच्या यशाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

