शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन):-
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . प्रथमत: विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व धम्म वंदना भंतेगण यांच्या हस्ते आणि मधुर वाणीने करण्यात आले . अभिवादन सभेचे प्रास्ताविक प्रा . राजेंद्र निकाळे यांनी केले . यावेळी गणेश कारखान्याचे तज्ञ संचालक ॲड . रघुनाथ बोठे , गणेश कारखान्याचे माजी चेअरमन ॲड. नारायणराव कार्ले , राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक सर्जेराव मते , माजी नगरसेवक भिमराज निकाळे , लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष संजय उबाळे , बोरुडे सर , माजी सैनिक भानुदास गाडेकर , आरपीआयचे प्रदीप बनसोडे , अरुण मोकळ सर , सचिन बनसोडे , भागवत आरणे इ . मान्यवरांनी अभिवादनपर शब्दसुमनांजली अर्पण केली .
यावेळी गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजुरकर , सोसायटीचे चेअरमन सुरेश गाडेकर , माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ , धनंजय गाडेकर , माजी उपनगराध्यक्ष धनंजय निकाळे , बौद्धाचार्य सुरेशराव बनसोडे , आरपीआयचे रावसाहेब बनसोडे , आर पी आयचे अध्यक्ष रमेश गायकवाड , कृष्णा शिंदे , बाळासाहेब कोळगे , पंकज पिपाडा , डॉ . संतोष मोकळ , गणेश निकाळे , पांडुरंग तुपे , बाबासाहेब पाळंदे , मोगलराव बनसोडे , संदीप सोनवणे , दिनकर निकाळे , वसंतराव पाळंदे , सुभाष जगताप , वसंत खरात , अशोक शिंदे , अक्षय गायकवाड , ॠषिकेश त्रिभुवन , सौ . गायकवाड ताई इ . मान्यवर उपस्थित होते .
अभिवादन सभेचे आयोजन भीमराज निकाळे , जितू दिवे, रावसाहेब निकाळे , दिलीप निकाळे , बंटी निकाळे , स्वराज निकाळे , अंकुश निकाळे , श्याम निकाळे , ओम निकाळे , इ . युवक कार्यकर्त्यांनी केले .

