shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुण्यस्मरणा प्रित्यर्थ मोहिते परिवाराचा स्तुत्य उपक्रम

पुण्यस्मरणा प्रित्यर्थ मोहिते परिवाराचा स्तुत्य उपक्रम

इंदापूर प्रतिनिधी: दिनांक १०/१२/२०२२ रोजी कै. तुकाराम सयाजी मोहिते यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा प्रित्यर्थ त्यांचा मुलगा सचिन व मोहीते परिवाराकडून जिल्हा परिषदेच्या शेळगाव शाळेस १५ हजार रु.किमतीचे चार व्हाईट बोर्ड ह.भ.प.वैष्णवीताई धायगुडे महाराज यांच्या हस्ते शाळेकडे सुपूर्द केले.या प्रसंगी मोहन दुधाळ,विठ्ठल शिंगाडे,राहुल जाधव, आबासाहेब शिंगाडे,पोपट ननवरे,विलास भांगे,भिवा जाधव,सुनील कुचेकर(शिक्षण विस्तार अधिकारी) सह मोहिते परिवारातील सदस्य उपस्थित होते.या फळ्यांचा स्वीकार शाळेचे मुख्याध्यापक नामदेव गुंड व शिक्षक संतोष वाघ यांनी केला. शिक्षिका वंदना काकडे व सविता मिसाळ यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
close