shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाजपा आमदार आणि विधानपरिषद गटनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत सुलोचना यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली..!


जगदीश का. काशिकर,
 कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई - लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण (92) यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज मुंबईतील गिरगावमधील फणसवाडी येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योतमालवली. साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायनातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. भाजपा आमदार आणि विधानपरिषद गटनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत सुलोचना यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण

दरेकर यांनी ट्विमध्ये म्हटले आहे की, ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचे आज मुंबईतील राहत्या घरी वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. पाडाला पिकलाय आंबा, सोळावं वरीस धोक्याचे, मला म्हणतात हो लवंगी मिरची, खेळताना रंग बाई होळीचा, पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, तुझ्या उसाला लागल कोल्हा, अशा एकापेक्षा एक मराठी चित्रपटसृष्टीत ठसकेबाज लावणी गात त्यांनी एक वेगळीच भूरळ श्रोत्यांना घातली होती. त्यांच्या निधनाने संगीत विश्वात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे दरेकर यांनी ट्विमधील शोक संदेशात म्हटले आहे.
close