shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

योगामुळे शारीरिक मानसिक आरोग्याबरोबरच बौद्धिक क्षमता वाढण्यास होते मदत - डॉ. लक्ष्मण आसबे

योगामुळे शारीरिक मानसिक आरोग्याबरोबरच बौद्धिक क्षमता वाढण्यास होते मदत - डॉ. लक्ष्मण आसबे 

मोफत योग प्राणयाम शिबिराची सांगता उत्साहात : पाच दिवसात योग प्राणयम व विविध उपक्रमांनी १८ वा वर्धापनदिन साजरा 
फोटो ओळ : इंदापूर पतंजली योग परिवाराच्या वतीने आयोजित पाच दिवशीय मोफत योग प्राणयाम शिबिराची सांगता करताना कामधेनु सेवा परिवाराचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण आसबे, दत्तात्रय अनपट व योग साधक मान्यवर



इंदापूर प्रतिनिधी : यम, नियम, अहम्, प्राणयाम यावर योग साधक यांचे चांगले काम झाले आहे. मात्र कुंडलिनी जागृत करण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच नियमित योग प्राणयाम केल्यामुळे  नागरिकांना शारीरिक, मानसिक, आरोग्याबरोबरच बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होते. असे प्रतिपादन कामधेनू सेवा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ. लक्ष्मण आसबे यांनी केले. 
इंदापूर शहरातील शहा सांस्कृतिक भवन येथे, पतंजली योग परिवाराच्या वतीने पाच दिवसीय मोफत योग प्राणयाम शिबिराची सांगता, डॉ. लक्ष्मण आसबे यांच्या 'योगाचे अंतिम साध्य' विषयावर मार्गदर्शन करून करण्यात आली. यावेळी पतंजली योग परिवाराचे अध्यक्ष, योगगुरू दत्तात्रय अनपट यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच पाच दिवसांच्या शिबिरामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, कै. भगवान भरणे पतसंस्थेचे अध्यक्ष मधुकर भरणे, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने, इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, माजी नगरसेवक शेखर पाटील, नंदकुमार गुजर, युवक नेते प्रशांत उंबरे यांच्यासह सामजिक, शैक्षणिक व राजकीय आदी क्षेत्रातील हजारो मान्यवर उपस्थित राहून योग प्राणयामचा लाभ घेतला. 
या पाचदिवशीय योग शिबिराचे प्रथम पुष्प, जेष्ठ योग शिक्षक अनंत झाबरे यांनी योग प्राणायाम व आयुर्वेद तसेच आहारातून संपूर्ण आरोग्य विना औषध गोळ्या निरोगी जीवन जगण्याची कला, याबाबत दोन दिवस योग वर्गामध्ये मार्गदर्शन केले. तसेच बुधवारी पतंजली योगपीठ हरिद्वारचे योगाचार्य विकास राणाजी यांनी सर्व रोग निवारण उपचार पद्धतीची माहिती व होम हवन याबाबतची माहिती दिली. तर गुरुवारी ज्येष्ठ योग शिक्षक हनुमंत साळुंखे यांनी दिनचर्या व घरगुती उपचार पद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली. 

यावेळी बोलताना योगशिक्षक दत्तात्रय अनपट म्हणाले की, मागील अठरा वर्षांपासून अखंडपणे इंदापूरमध्ये स्थायी योग वर्ग मोफत सुरू आहे. यासाठी शहा परिवाराचे मुकुंद शहा, नगरसेवक भरत शहा तसेच सोनाई परिवाराचे दशरथ माने यांचे तन, मन आणि धनाने मोठे सहकार्य योग् परिवाराला लाभले आहे. असे अनेक मान्यवरांनी सहकार्य केल्यामुळेच हजारो नागरिकांचे आरोग्य चांगले राहिले आहे. त्याचबरोबर शेकडो नागरिकांचे प्राण देखील यामुळेच वाचले आहेत. 

यावेळी संजीवनी योग परिवाराचे व पतंजली परिवाराचे शहाजी बोराटे, मायाताई विंचू,  यांनी व सर्व योग साधकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले तर प्रास्ताविक पतंजली योग परिवाराचे उपाध्यक्ष मदन चव्हाण यांनी केले. तर दररोजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सुनिता गलांडे यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक दत्तात्रय दडस यांनी मानले. 


चौकट : इंदापूर योग भवनसाठी सोनाई परिवार देणार पाच लाख रुपये

इंदापूर तालुक्यातील मुली, महिला व नागरिकांचे आरोग्यासाठी दररोज योग प्राणयाम करणे आवश्यक आहे.  तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी सोनाई परिवार नेहमीच मदत करीत असते. त्यामुळे इंदापूर योग भवनच्या इमारतीसाठी सोनाई परिवाराचे वतीने पाच लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची ग्वाही, सोनाई परिवाराचे सर्वेसर्वा दशरथ माने यांनी दिली. 



close