shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आत्मतत्त्वाच्या आधारे दिव्यदृष्टीची प्राप्ती करणे मानवी जीवनाची सार्थकता परमपूज्य शिवानंद दादाजी महाराज यांचे प्रतिपादन..!

शिर्डी -  जीवनात काही चांगले प्राप्त करून घ्यायचे असेल तर जीवनात आधी ध्येय निश्चित करण्याची गरज आहे, असे सांगून जीवन सुंदर करायला भगवंताचे नित्य स्मरण व चिंतन केले तर भगवत प्राप्ती निश्चित होते,यासाठी गुरूंनी व  संतांनी दाखविलेल्या सद्विचारांचा तसेच आत्मतत्त्वाच्या आधारावर दिव्यदृष्टीची प्राप्ती सुद्धा होऊ शकते यामुळे मानवी जीवनाचे सार्थक होते,असे प्रतिपादन येथील ओम दादाजी महाराज दरबाराचे श्री स्वामी शिवानंद दादाजी महाराजांनी उपस्थित शेकडो भक्तांसमोर बोलताना केले. 


पिंपळनेर येथे ओम  शिवानंद दादाजी महाराज परिवार तर्फे परम संत परमपूज्य ओम श्री श्री 1008 धुनीवाले दादाजी महाराज खंडवा यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात श्री शिवानंद दादाजी महाराज प्रवचनातून उपदेश करताना बोलत होते. या सोहळ्यात विविध सांस्कृतिक ,अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. 

ओम धुनीवाले दादाजी महाराज दरबाराच्या वतीने दरवर्षी हा सोहळा साजरा केला जातो. याप्रसंगी या परिवाराचे प्रमुख श्री शिवानंद महाराज यांचा प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून शेकडो शिष्यगण यावेळी उपस्थित होता. कार्यक्रमात सरपंच देविदास सोनवणे, पंचायत समिती सदस्य देवेंद्र गांगुर्डे, माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर एखंडे, सभापती संजय ठाकरे, माजी सरपंच योगेश नेरकर, सदस्य योगेश बधान, प्रमोद गांगुर्डे ,पांडुरंग सूर्यवंशी , प्रतिष्ठित व्यापारी धनराज जैन, नवकार ग्रुपचे संचालक रिखबशेठ जैन ,श्याम पगारे, पत्रकार सुभाष जगताप ,विशाल गांगुर्डे, राजेंद्र गवळी, तसेच गावातील हभप भालचंद्र दुसाने, हभप विजय महाराज काळे ,माऊली परिवाराचे व मुरलीधर मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पगारे, सोसायटीचे माजी चेअरमन चेतन पगारे आदी विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते परिवाराच्यावतीने यावेळी शाल श्रीफळ पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आपल्या भोगवत्या शैलीत बोलताना जीवन हे एक दूध आहे या दुधात मीठ टाकायचे की साखर टाकायची हे मानवाने ठरवावे साखर टाकली तर जीवनात माधुरी व गोडवा निर्माण होतो याचाच अर्थ भगवंताचे ध्यान योग साधन व नामस्मरण केले तर परमार्थ घडू शकतो  मृत्यू म्हणजे जीवनाचा त्याग असून आत्मा हा चैतन्याचा गाभा आहे असे सांगून ब्रह्म सत्ते व अनिवासी आहे सूक्ष्म जीवनाचा नाश नक्कीच होतो पण आत्मा अमर असतो  भगवंताचे नामस्मरण व अध्यात्मशिवाय भगवंत प्राप्ती होत नाही यासाठी जीवनात सद्गुरूंची आवश्यकता असते बाह्यमन जडत्व भौतिक आकर्षणाचे केंद्र असले तरी अंतरमानाने भाव व्यक्त केला तर जीवन सुंदर बनते  पवित्र मानाने नाम जप व ध्येयाचा सत्संग विवेक बुद्धीने वापर करा याच्यातच जीवनाचे सार्थक असल्याचे त्यांनी सांगितले संतांचे विचार मानवी कल्याणासाठी असतात म्हणून प्रत्येक मानवाने संतांच्या उपदेशाप्रमाणे व त्यांनी दाखवलेल्या संत वचनाप्रमाणे मार्गक्रमण केल्यास जीवनाचे सार्थक होते असा विश्वासी त्यांनी भक्तांना बोलून दाखवला याप्रसंगी ओम दादाजी शिवानंद महाराज परिवाराचे शिष्य गण राजपूत दांपत्य यांच्या हस्ते महाराज व माता द्वारकामाई यांचा पाद्यपूजन करून सन्मान करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिवारातील विविध ठिकाणाहून आलेल्या प्रमुख भक्तांनी परिश्रम घेतले याप्रसंगी प्रमोद शिंदे यांनीही महाराजांच्या आदेशान्वये भगवत विचार मांडलेत. यावेळी शिवाजी भोर सचिन भंधुरे, पोपट अहिरे ,जालिंदर दांगडे ,प्रताप राठोड, दयाराम करेकर, शिवाजी लोंढे, अंबादास चव्हाण, सतीश करपे ,संदीप कोठावदे, बबनराव खेडकर, प्रमोद शिंदे, अशोक कोठावदे, संजय खांडेकर ,सुभाष विधाते ,दयाराम पवार ,प्रवीण गांगुर्डे, अंबादास चव्हाण, दीपक महाजन, युवराज पारवे यांच्यासह अनेक शिष्यगणांनी परिश्रम घेतले.
close