आज परमपूज्य जगतगुरु शंकराचार्य स्वामी श्री
न अधोक्षजानंद देव तीर्थ जी महाराज हे शिर्डीत साई दर्शनाला आले असता त्यांनी साई मंदिरात जात मनोभावे साईबाबांचे दर्शन घेत पाद्यपुजा केलीय.
यावेळी त्यांच्या समवेत आसामचे मंत्री बोलिन चोटिया, शिर्डीतील शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते,राजेंद्र देवकर, युवासेना जिल्हा प्रमुख. शुभम वाघ,शिवाजी दिशागत,साई निर्माणचे विजय कोते,चंद्रकांत गायकवाड यांसह मोठ्या संख्येने भाविक गण उपस्थित होते.
पुरी जगन्नाथ पिठाचे शंकराचार्य स्वामींनी बारा ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ दर्शन भ्रमण करत असताना महाराष्ट्र दर्शन दरम्यान त्र्यंबकेश्वर नाशिक येथून शिर्डीत येत शंकराचार्यांनी साई दर्शन घेतले शिर्डीत सिद्ध पुरुष साई बाबांचे दर्शन घेऊन मनाला आनंद झाल्याचे सांगत शिर्डीत अध्यात्मिक ऊर्जेची अनुभूती झाल्याचे सांगत बाबांकडे राज्याच्या कल्याणासाठी प्रार्थना केली असल्याचे त्यांनी सांगितले
कमलाकर कोते आणि विजय कोते यांनी यावेळी त्यांचा यथोचित सन्मान केला व साईबाबांची शाल आणि उदी त्यांना भेट स्वरूपात दिली जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी शिर्डीत सर्व दर्शन तसेच निवासाची सुंदर व्यवस्था केली तसेच संस्थानच्या कर्मचाऱ्यांची वागणूक सुद्धा अतिशय नम्रपणे असल्याचे दिसून आल्याचे शंकराचार्यांनी सांगितले.

