shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी येथे विविध ठिकाणी संताजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी..!

शिर्डी प्रतिनिधी ( संजय महाजन ):
संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या ३९८ व्या जयंतीनिमित्ताने शिर्डी शहर तेली समाज व शिर्डी नगरपरिषद शिर्डी यांच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिर्डी येथे सकाळी ९:०० वाजता अभिषेक पूजा श्री दिलीप भाऊ राऊत व सौ आशाताई राऊत यांच्या हस्ते संपन्न झाली तर सकाळी १०:३० वाजता शिर्डी नगर परिषदेत मध्ये मुख्याधिकारी श्री काकासाहेब डोईफोडे साहेब व प पु शंकराचार्य महाराज, शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख व लोकनेते कमलाकर कोते पाटील यांच्या शुभ हस्ते श्री संताजी महाराज जगनाडे यांची प्रतिमा पूजन करून जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी सर्व उपस्थित मान्यवर व परमपूज्य श्री शंकराचार्य महाराज यांचा सत्कार जेष्ठ मार्गदर्शक श्री यशवंतराव वाघचौरे यांच्या हस्ते करण्यात आला.

    यावेळी तेली समाज जिल्हाध्यक्ष ॲड.विक्रांत वाघचौरे , जिल्हा निरीक्षक श्री बद्रीनाथ लोखंडे, शहर कार्याध्यक्ष श्री सोमनाथ महाले, जेष्ठ मार्गदर्शक श्री यशवंतराव वाघचौरे , श्री रवींद्र कर्डीले, श्री रविंद्र महाले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री शशिकांत महाले, सौ.अंजली ताई कोते मॅडम , श्री सचिन लुटे, श्री प्रशांत कवडे, श्री नंदकुमार व्यवहारे, श्री दिलीप चौधरी, श्री राजू पाडसवान, श्री विठ्ठल जाधव, श्री गणेश मिसाळ, मंगेश जिभकाटे सर, श्री सुरेंद्र महाले व समस्त तेली समाज बांधव व शिर्डी नगर परिषद कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते
close