shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सध्या मालकाला खुश करण्यासाठी स्पर्धा सुरू असून याच माध्यमातून महाराष्ट्रातील महापुरुषाची बदनामी करण्याचे मोठे षडयंत्र सुरू - आ. अमोल मिटकरी .

सध्या मालकाला खुश करण्यासाठी स्पर्धा सुरू असून याच माध्यमातून महाराष्ट्रातील महापुरुषाची बदनामी करण्याचे मोठे षडयंत्र सुरू - आ. अमोल मिटकरी .
इंदापूर प्रतिनिधी: सध्या मालकाला खुश करण्यासाठी स्पर्धा सुरू असून याच माध्यमातून महाराष्ट्रातील महापुरुषाची बदनामी करण्याचे मोठे षडयंत्र सुरू असल्याचा घणाघात विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला.
      इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित शरद कृषी महोत्सव 2022 अंतर्गत युवा महोत्सवाच्या पहिल्या सत्रात अमोल मिटकरी बोलत होतो. माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे आमदार रोहित पवार पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, हनुमंत कोकाटे, छाया पडसळकर, सचिन सपकळ,प्रताप पाटील, रेहना मुलाणी, प्रवीण डोंगरे, तुकाराम करे, दिलीप वाघमारे, धनंजय बब्रास, श्रीधर बाब्रस, बापूराव शेंडे,सध्या मालकाला खुश करण्यासाठी स्पर्धा सुरू असून याच माध्यमातून महाराष्ट्रातील महापुरुषाची बदनामी करण्याचे मोठे षडयंत्र सुरू असल्याचा घणाघात विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला.
      इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित शरद कृषी महोत्सव २०२२ अंतर्गत युवा महोत्सवाच्या पहिल्या सत्रात अमोल मिटकरी बोलत होतो. माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे आमदार रोहित पवार पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, हनुमंत कोकाटे छाया पडसळकर, सचिन सपकळ,प्रताप पाटील, रेहना मुलाणी,  धनंजय बब्रास, श्रीधर बाब्रस, बापूराव शेंडे, संदेश देवकर ,अभिजीत तांबिले, नवनाथ रुपनवर,सागर मिसाळ यांचेसह च सह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी बोलताना मिटकरी यांनी भिक मागून मंत्री पद मिळवता येते मात्र शाळा उभ्या करता येत नाहीत. शाळा उभ्या या कष्टाने कराव्या लागतात असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटील त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर लगावला. सध्याचे सरकार अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहे राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिषाला हात दाखवतात.तर राफेल विमान आणताना चाकाखाली लिंब ठेवली जातात. चाळीस आमदार गुवाहाटीला जाऊन नवस बोलतात त्यांनी बेळगावला जाऊन महाराष्ट्राच्या हितासाठी लढा द्यावा असे खुले आवाहन मिटकरी यांनी यावेळी केले. 
    यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्र ही आपली अस्मिता आहे महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जाणे यास आमचा विरोध आहे एखाद्या राज्याची निवडणूक असेल तर त्या राज्यातील लोकांना खुश करण्यासाठी महाराष्ट्रावर केला जाणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही.राजकारणासाठी कोणीही आपला वापर करणार नाही याची खबरदारी युवक युवतींनी घेणे आवश्यक आहे. तसेच सर्व थोर व्यक्ती महाराष्ट्र देश यांच्या विरोधात जर कोण बोलत असेल तर युवकांनी शांत बसता कामा नये सोशल मीडियावर असे विचार आल्यास त्यास जोरदार विरोध करणे आवश्यक आहे.
  यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, प्रदीप गारटकर यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल रूपनवर व प्रतिक्षा बालगुडे यांनी केले.
close