shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लाखेवाडी येथील जय भवानीगड विकास प्रतिष्ठान येथे संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.


लाखेवाडी येथील जय भवानीगड विकास प्रतिष्ठान येथे संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांना व  कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित शिक्षण संकुलात संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल , विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आणि विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी लाखेवाडी संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य जिल्हास्तरीय पुणे,सोलापूर आंतरशालेय बुध्दीबळ स्पर्धा २०२२ वर्ष-दुसरे शनिवार दिनांक २४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ठीक ९.३० वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. 

बुध्दीबळ स्पर्धेची सुरुवात संस्थेचे विश्वस्त  पृथ्वी ढोले व  ऋषिकेश  ढोले यांनी प्रथम चाल खेळून   बुद्धीबळ  स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.स्पर्धेमध्ये एकूण २३० विद्यार्थी पुणे व सोलापूर जिल्ह्यातून सहभागी झाले होते.
 विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभागी होऊन गतवर्षी प्रमाणे यावर्षीही उत्तम प्रतिसाद दिसून आला.

यामध्ये स्पर्धेचे एकूण तीन गट तयार करण्यात आले होते.गट - अ १० वर्षाखालील, गट - ब ११ते १५ वर्षगट ,गट - क १६ ते २१ वर्षगट अशी आयोजित करण्यात आली होती.  व स्पर्धेचे परीक्षण अत्यंत पारदर्शकपणे करण्यात आले .

स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे 
गट -अ - पहिला क्रमांक- कु.अनन्या अमोल बाळापुरे२००१रु, चषक व प्रमाणपत्र
दुसरा क्रमांक- कु.श्रीराज महावीर देवडे१००१ रु, चषक व प्रमाणपत्र ,तिसरा क्रमांक-रियान जाधव ५०१ रु,चषक व प्रमाणपत्र ,चौथा क्रमांक-प्रज्ञा संजय कांबळे२५१ रु ,चषक व प्रमाणपत्र पाचवा क्रमांक -राजवर्धन दादासाहेब पराडे २५१ रु ,चषक व प्रमाणपत्र 
गट -ब - पहिला क्रमांक- ३००१रु, चषक व प्रमाणपत्र
दुसरा क्रमांक- २००१ रु, चषक व प्रमाणपत्र ,
तिसरा क्रमांक- १००१ रु, चषक व प्रमाणपत्र ,
चौथा क्रमांक-५०१ रु ,चषक व प्रमाणपत्र 
पाचवा क्रमांक -५०१ रु ,चषक व प्रमाणपत्र 
गट क  - पहिला क्रमांक- मिहीर राजेश सरवदे५००१रु, चषक व प्रमाणपत्र दुसरा क्रमांक- गणेश अकोलकर३००१ रु, चषक व प्रमाणपत्र ,
तिसरा क्रमांक- सुयश सचिन माने२००१ रु, चषक व प्रमाणपत्र ,चौथा क्रमांक- सुमित संतोष गरगडे५०१ रु ,चषक व प्रमाणपत्र पाचवा क्रमांक - ओम शहाजी मोरे ५०१ रु ,चषक व प्रमाणपत्र 

 संस्थेचे अध्यक्ष  श्रीमंत ढोले सर, संस्थेच्या उपाध्यक्षा  सौ. चित्रलेखा ढोले मॅडम, संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे , संस्थेचे प्रमुख  सल्लागार  प्रदीप गुरव सर ,संस्थेचे प्रशासक  गणेश पवार सर ,फार्मसी कॉलेजचे प्राचार्य  खेडकर सर,संस्थेचे सर्व सुपरवायझर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थी स्पर्धक यांचे अभिनंदन केले  
close