shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अ.ए.सोसायटी प्राथमिक शाळा वांबोरी वार्षिक स्नेहसंमेलन थाटात संपन्न..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
सोमवार दिनांक २६ डिसेंबर २०२२

अ.ए.सोसायटी प्राथमिक शाळा वांबोरी वार्षिक स्नेहसंमेलन थाटात संपन्न..!!

राहुरी (वांबोरी) :  अ.ए.सो.ची प्राथमिक शाळेचे  वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवारी वांबोरी येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.सौ.हेमा राजेंद्र शेलोत (आरोग्यवर्धिनी निसर्गोपचार संस्था) अहमदनगर ह्या होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून मा. सौ. उषा सुपनार (मॅनेजर सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वांबोरी ) ह्या होत्या त्यांच्या समवेत शाळा समितीचे चेअरमन श्री. हेमंत शेठ मुथा,सदस्य अनुज पंचरिया, सौ. अचला झंवर, पत्रकार श्री. गोरक्षनाथ दुधाडे  आदी. उपस्थित होते.
           पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गुण गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. सुपनार मॅडम यांनी आपले मनोगत मांडताना आपल्या व्यवसायातील  गमंती-जंबती सांगून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. माननीय अध्यक्ष यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना आहाराचे आणि व्यायामाचे महत्त्व सांगितले ; आपली योग्य दिनचर्या कशी असावी याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित पालकांनाही त्यांनी प्रबोधन केले.
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मीना पवार मॅडम यांनी केले आभार प्रदर्शन शिक्षक प्रतिनिधी श्रीमती शिंदे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती तोडमल मॅडम यांनी केले.
 विद्यार्थी कु.गांधले भाग्येश व विद्यार्थिनी  कुमारी केंद्रे, सिद्धी धनंजय या विद्यार्थ्यांची आदर्श विद्यार्थी म्हणून निवड झाली. श्री.खेले सर व सोनवणे सर यांनी निमंत्रनाचे काम केले स्नेहसंमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. स्नेहसंमेलन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close