रेडणी ग्रामपंचायत निवडणुकीनंतर भाजप मधील काही कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील रेडणी गावातील भाजप कार्यकर्ते  एडवोकेट भारत कदम, श्री स्वामी समर्थ विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन किसन काळे, राजेश काळे,माजी ग्रामपंचायत सदस्य हनुमंत कदम, धनाजी तरंगे, हनुमंत चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी भरणेवाडी येथे नूतन ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला.
 यावेळी गावातील सुभाष पाटील, , नूतन ग्रामपंचायत सदस्य सचिन काळे, शहाजी पाटील,  माजी सरपंच व विद्यमान सदस्य स्वाधीन खाडे, अजय हाके,राहुल तरंगे व तुकाराम रुपनवर ,नवनाथ पिसाळ, संतोष तरंगे ,दिनकर चव्हाण उपस्थित होते. अशी माहिती नूतन ग्रामपंचायत सदस्य सचिन काळे यांनी दिली.

स्वर्गीय शंकरराव पाटील यांच्या विचारधारानुसार व तेव्हापासून आम्ही हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाबरोबर होतो  परंतु ते काही लोकांवरच विश्वास ठेवत असून आम्हाला विश्वासात न घेतल्याने आम्ही हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्व नाकारून राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार व तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचे भारत कदम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.