शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
सोमवार दिनांक २६ डिसेंबर २०२२
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत जिल्ह्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार- माजीमंत्री प्राजक्त तनपुरे..!!
राहुरी : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत जिल्ह्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार असून राष्ट्रवादी काँगेसचेच प्रतिनिधी वांबोरी गटातून व गणातून निवडून द्यावे, असे आवाहन माजीमंत्री आ.प्राजक्तदादा तनपुरे यांनी केले आहे.
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे आ. प्राजक्तदादा तनपुरे यांच्या विशेष प्रयत्नातून स्थानिक विकास निधी अंतर्गत ६० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे शुभांरभ व लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
आ. तनपुरे म्हणाले, प्रत्येक रस्ता जनतेच्या दृष्टीने महत्वाचा असतो. त्यासाठी वांबोरी गावातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यांना माझ्या आमदार निधीतून जवळपास ६० लक्ष रुपयांचा निधी देऊन प्रत्यक्ष काम सुरू केले आहे. गेल्या आडीच वर्षात वांबोरी साठी भरपूर निधी दिला असून ʻआधी केले, मग सांगीतलेʼ या प्रमाणे या भागाच्या विकासासाठी आपण कटिबध्द आहोत. म.वि.आ सरकारच्या काळात थेट मुळाधरणातून जवळपास ४० कोटी रुपयांच्या पाणी योजनेचा बारकाईने अभ्यास करून गावाच्या दृष्टीने पाच पाण्याच्या टाक्यांचा आराखडा तयार करून मंजूरी आणून प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. यामुळे वांबोरी गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मिटणार आहे. वांबोरीकरांना म.वि.आ सरकारच्या काळात ३२ ट्रान्सफॉर्मर दिले.
तसेच खडांबे येथे नविन सबस्टेशन दिले. नगर वांबोरी रस्त्याचे काम केले.अशा अनेक कामांना म.वि.आ सरकारच्या काळात प्राधन्य दिले.
जि.प चे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे म्हणाले, जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन वांबोरी गावातील रस्ता खोदून ठेवला. नतंर आचारसहिंतेचे कारण सांगून जनतेची दिशाभूल करण्याचा मानस होता. मात्र, निवडणूक पुढे ढकलल्याने समोरच्यांचे पितळ उघडे पडले. रस्ता खोदल्याने पाच महिने जनतेची खुप हाल झाली. अनेक अपघात झाले. ४ वर्ष झोपा काढायच्या आणि निवडणूका जवळ आल्या कि, जनतेचा कळवळा असल्याचे नाटक करायचे. ४० वर्ष गावाने सत्ता दिली. परंतू ४० वर्षापासून गावातील काही रस्ते, आहे तसेच आहे. असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. आ. तनपुरे मंत्री झाल्यावर अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत वांबोरी गावासाठी थेट मुळा धरणातून ४० कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर करून आणली.
यावेळी राष्ट्रवादी न्याय विभागाचे अभिजीत ससाणे, नितीन बाफना, संत सावता माळी संघटनेच्या जयश्री व्यवहारे, माजी सरपंच ॲड.ऋषीकेश मोरे, किसनराव जवरे,प्रशांत नवले, नवनाथ गवते, ऋषीकेश घुगरकर, ईश्वर कुसमुडे, मंजूश्री देवकर, कारभारी गांधले, विशाल कुसमुडे, राम काळे, महेश साळुंखे, विजय गांधले, हमीदभाई शेख, शहानवाज कोतवाल, इम्रान कुरेशी, इमाम शेख, गोरक्षनाथ ढवळे, खुर्शिद जनाब, सोहेल शेख, रतन पटारे, बंडू पटारे, बंटी मोरे, पोपट देवकर आदी उपस्थित होते.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

