इंदापूर तालुक्यात एक दिवस स्वच्छता व घरकुल लाभार्थ्यांसाठी राबवले अभियान.
पहिला हप्ता देऊन सुरू न केलेले घरकुल लाभार्थी यांना दिले गांधीगिरी पद्धतीने गुलाब पुष्प व नोटीस.
गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी स्वच्छता श्रमदान अंतर्गत केले विद्यार्थी व ग्रामस्थांच्या बरोबर स्वच्छता श्रमदान.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्यात महाअमृतआवास अभियान अंतर्गत जास्तीत जास्त घरकुल अंतर्गत घरे पूर्ण करण्याचे लाक्षांक आहे. त्यासाठी आढावा चालू असून जिल्हा परिषद राज्य शासन यांच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रकल्प संचालिका श्रीमती शालिनी कडू आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग उपकार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे यांच्या नेतृत्वाखाली आज (ता.२३)दिवसभर इंदापूर तालुक्यात गावोगावी स्वच्छता अभियान व घरकुल लाभार्थी यांना भेटी देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमांमध्ये पंचायत समिती तालुकास्तरीय अधिकारी कर्मचारी दिलेली नेमणुकीनुसार संबंधित ग्रामपंचायत मध्ये उपस्थित दर्शवत व त्या त्या ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्यासह सरपंच सदस्य व ग्रामस्थ यांच्या समवेत गावोगावी स्वच्छता श्रमदान व घरकुल लाभार्थी यांना भेटी देऊन घरकुलाचा पहिला हप्ता घेऊन सुरू न केलेल्या ८२५ घरकुल लाभार्थी यांना नोटीस व गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने सांगून प्रवृत्त करण्यात आले. तसेच आधार नंबर अपलोड करणे बाकी असलेले इंदापूर तालुक्यातील ७४० लाभधारक यांना आज आधार अपलोड करण्यासंदर्भात सूचना केल्या असता जवळजवळ ५०० लाभ धारकांनी आधार अपलोड केल्या.
आज इंदापूर तालुक्यातील वडापुरी, पंधरवाडी ,जाधववाडी या गावात इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन त्या ठिकाणी गावातील ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांच्या समवेत स्वच्छता करत कचरा व्यवस्थापन करण्यासंदर्भात सूचना करत मार्गदर्शन केले.
तसेच दुकानांमध्ये कचराकुंड्या उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक शौचालयाची कामे पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करावा .एका शोष खड्ड्याच्या शौचालयाची दोन शोषखड्ड्याच्या शौचालयात रूपांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गाव हागणदारीमुक्त करावयाचे असल्याने घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत कामाची सुरुवात करून सुरू असणारे कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
वडापुरी येथे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी भेट देऊन ग्रामपंचायतचे सदस्य ग्रामस्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थी श्रीनाथ विद्यालयातील शिक्षक विद्यार्थी यांच्या समवेत स्वच्छता केली तसेच एक हप्ता घेऊन घरकुल चालू न केलेल्या लाभार्थी यांना ग्रामसेवक यांच्या समवेत काही लाभार्थी यांना स्वतः घरकुल पूर्ण करण्यासाठी नोटीस व गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने विनंती केली.
यावेळी वडापुरी गावचे ग्रामपंचायत सदस्य आनंद चंदनशिवे, सदस्या अंबिका बागल, बबलू चंदनशिवे, भारत चंदनशिवे, नामदेव कांबळे व ग्रामसेवक नंदराज चंदनशिवे ग्रामपंचायत कर्मचारी होते.

