स्पर्धेत टिकण्यासाठी शेतकर्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान व अध्यावत माहिती मिळण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा- शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.पंडितराव पाटील.
बावडा येथे शेतकरी संघर्ष समिती व ग्रामपंचायतीच्या वतीने "शेतकरी संवाद सभेचे आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी : जागतिकीकरणाच्या गतिमान प्रक्रियेमुळे आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेत टीकून राहण्यासाठी शेतकर्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान व अध्यावत माहिती मिळण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.पंडितराव पाटील यांनी केले.
बावडा येथे शेतकरी संघर्ष समिती व ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या "शेतकरी संवाद सभेत" मुख्य आयोजक म्हणून शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. पंडितराव पाटील बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रगतीशील शेतकरी शिवाजीराव पवार हे होते. सभेस शेतकरी व बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी पुढील चार तज्ञांची व्याख्याने झाली (1)कृषि विस्तार अधिकारी युन्नुस शेख ,विषय-कृषि विभागाच्या विविध योजना.(2 बाजीराव पाटील,कोल्हापूर विषय-राष्ट्रीय बायोगॅस योजना.(3)बचत गट तालुका व्यवस्थापक सौ.राणी ननवरे,विषय-स्वयंसहायता महिला बचत गटाचे व्यवस्थापन. (4)तेजस जगताप,विस्तार अधिकारी ग्रामपंचायत,विषय-घरकूल योजनेचे लाभार्थी कसे बनावे?(5)बावडा मंडल कृषि अधिकारी गणेश सूर्यवंशी,विषय-सेंद्रिय शेती काळाची गरज ? अशी पाच तज्ञांची व्याख्याने झाली.
शेतकरी दिनाच्या निमीत्ताने किमान उत्पादन खर्चात कमाल पीक उत्पादन काढणार्या प्रयोगशील शेतकर्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. (1)केळी उत्पादक शेतकरी सुभाष शिवाजी आगलावे,बावडा..हस्ते-तालुका कृषि अधिकारी भाऊसाहेब रूपनवर.(2)सचिन महादेव काळे,बावडा,ड्रॅगन फ्रुट-हस्ते शशिकांत आगलावे. (3)नामदेव हरिदास पवार,गारअकोले,ऊस उत्पादक हस्ते-श्री.निलेश घोगरे ,उपसरपंच. (4)ज्ञानेश्वर घोगरे,बावडा,ऊस उत्पादक,हस्ते-. गणेश सूर्यवंशी मंडल कृषि अधिकारी. (5)डाॅ. श्री.बिभिषण सुद्रिक ,बोराटवाडी ,हस्ते-शंकरराव घाडगे.
शेतकरी दिनाच्या निमीत्ताने आयोजित केलेल्या "स्वाक्षरी स्पर्धेत "चारशेहून अधिक शेतकर्यांनी भाग घेतला.या स्पर्धेत यशस्वी झालेल्या पुढील शेतकर्यांना प्रशस्तिपत्र व बक्षिसे देण्यात आली. (1)प्रथम क्रमांक,बाळासाहेब माणिक मोरे.रू.एक हजार. कै.वसंतराव व्यंकटराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राजेंद्र वसंतराव पाटील यांचे बक्षिस. (2)द्वितीय क्रमांक ,ॠषिकेश नंदकुमार जाखलकर.रू.सातशे.कै.पोपटराव हनुमंतराव घोगरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गणेश पोपट घोगरे यांचे बक्षिस. (3)तृतीय क्रमांक,दिनेश अच्युतराव पाटील,रू.पाचशे.किसान कृषि सेवा केंद्र बावडा,चालक ताहेर नबिलाल मुलाणी यांचे बक्षिस. (4)उत्तेजनार्थ,अंकुश यादवराव घाडगे;.रमाकांत शिवदास शिरसाठ;सौ.रेश्मा अतुल गायकवाड. प्रत्येकी शंभर रूपये,पदमावती वस्तू भांडार बावडा यांचे बक्षिस.
या कार्यक्रमास दादा कांबळे, चिंतामणी गायकवाड विजय काटकर,शशिकांत आगलावे,विविध संस्थेचे पदाधिकारी,ग्रामस्थ,शासकीय अधिकारी,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार सभा अध्यक्ष शिवाजी पवार यांनी व्यक्त केले.

