वृक्षांनी आपणास समतेची व एकतेची शिकवण दिली- पंडितराव पाटील.
बावडा येथे शेतकरी दिनानिमित्त श्री शिवाजी विद्यालयात दोन हजार झाडांचे वाटप.
ट्रॉपिकल ऍग्रो सिस्टीम,अग्रिकॉस ग्रुप बावडा व शेतकरी संघर्ष समिती बावडा यांच्यावतीने आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी: शेतकरी दिनानिमित्त श्री शिवाजी विद्यालय बावडा या ठिकाणी(ता.२३) दोन हजार झाडांचे वाटप केले हा कार्यक्रम ट्रॉपिकल ऍग्रो सिस्टीम,अग्रिकॉस ग्रुप बावडा व शेतकरी संघर्ष समिती बावडा यांच्यावतीने आयोजित करण्यात आला .या वेळी उपस्थित ट्रॉपिकल ऍग्रो सिस्टीमचे एरिया सेल्स मॅनेजर ताहेर मुलाणि, शेतकरी संघर्ष समिती बावडाचे अध्यक्ष पंडित पाटील, अमर कृषि सेवा केंद्र बावडाचे चालक किशोर घोगरे,स्वराज्य ऍग्रो बावडाचे चालक सूरज शेठे. इंडियन बँक सुरवडचे शाखा व्यवस्थापक योगेंद्र सर उपस्थित होते.
याप्रसंगी मानवी जीवनातील वृक्षाचे महत्व विशद करतांना प्रा.पाटील म्हणाले की,मानवी जीवन संमृध्द व संपन्न करण्याचे काम वृक्षांनी केल्यामुळे आपल्या ॠषीमुनींनी वृक्षाची मनोभावे पूजा करण्याची शिकवण दिली.वृक्षांनी आपणास समतेची व एकतेची शिकवण दिली आहे. एक परिपक्व वृक्ष तासाला ७१२ किलो प्राणवायूची निर्मिती करत असल्याचे सांगून पर्यावरण रक्षणासाठी आपण राष्ट्रीय कर्तव्य बजावले पाहिजे .
या प्रसंगी इंडियन बॅंक सुरवडचे व्यवस्थापक योगेंद्र वाव्हळ यांनी आम्ही कसे घडलो यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दशरथ घोगरे यांनी तर आभार उपप्राचार्य जगताप यांनी केले.

