shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथील ह.चांदशाहवली बाबा ऊरुसाची उत्साहात सांगता ..


इंदापूर येथील ह.चांदशाहवली बाबा ऊरुसाची उत्साहात सांगता .. 

फटाक्यांची आतषबाजी आणि शोभेचे  दारूकामाने बाबांच्या झेंड्याची ग्रामप्रदिक्षणा .
इंदापूर प्रतिनिधी: पोलीस निरीक्षक टी .वाय. मुजावर  यांचे हस्ते गलफ व फुलाची चादर अर्पण करून प्रारंभ झालेल्या चांदशाहवली बाबांच्या तीन दिवसांच्या उरूसाची सांगता पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरतशेठ शहा यांच्या उपस्थितीत झेंड्याच्या ग्रामप्रदिक्षणेने झाली .
 उरूसाचे हे ४५८वे वर्ष असून सर्वधर्मियांच्या धार्मिक व सांस्कृतिक ऐक्याचे प्रतिक असणारे ग्रामदैवत म्हणून बाबांच्यादर्ग्याची ख्याती आहे .
       मागील दोन वर्षात कोरोना संकटामुळे उरुस साधेपणाने करण्यात आला होता. परंतू या वर्षी कोणतेही निर्बंध नसल्याने मोठया उत्साहात नागरिकांची गर्दी झालेली पाहण्यास मिळाली सुमारे दोन ते अडीच लाख भक्तांनी हजेरी लावली .
   उरूसाचे मुख्य दिवशी उरूस कमीटीकडून शिरा या महाप्रसादाचे वाटप करणेत आले. सुमारे ६०हजार भाविकांनी याचा लाभ घेतला .

चौकट :
नगरसेवक भरत शेठ शहा यांचे उपस्थितीत शोभेचे दारूकाम व फटाक्यांची आतषबाजीत बाबांच्या झेंडयाची ग्राम प्रदिक्षणेला सुरुवात झाली . यावेळी झेंडयाचे दर्शन घेण्यासाठी व नारळाचे तोरण बांधण्यासाठी शहरातील तसेच आसपासच्या ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने हिंदु मुस्लीम भाविक उपस्थित होते .
   उरुस कमीटीचे अध्यक्ष आझाद पठाण . उपाध्यक्ष महादेव चव्हाण, प्रमुख मानकरी हमीदभाई आत्तार,
ट्रस्टी मुनीर मुलावर ,महामुद मुजावर ,श्रीधर बाब्रस,हाजी मुनीर बेपारी, दादा इनामदार, इब्राहीम बाबा शेख,
फकिर पठाण,जाकीर पठाण,अहमदरजा सय्यद,बन्सी भंडलकर , प्रदिप  जामदार ,अनिल चव्हाण, एकनाथ जाधव आदींनी उरूस पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले .

सदर उसाला माजी राज्यमंत्री व आमदार दतात्रय भरणे,
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, तहसिलदार श्रीकांतजी पाटील, राष्ट्रीय महासचिव बी.एम.पी.राहुल मखरे , शिवाजी मखरे,अरविंद वाघ,पोलीस निरिक्षक
टि .वाय. मुजावर, आजी माजी नगरसेवक पदाधिकारी इ . मान्यवरांनी उपस्थित राहून दर्शन घेतले .
close